प्रेमाचे सूर जुळल्यानंतर 45 वर्षीय पत्नी 20 वर्षांच्या दिरासोबतच झाली फरार, नवऱ्याने दोघांचाही केला खून

प्रेमाचे सूर जुळल्यानंतर 45 वर्षीय पत्नी 20 वर्षांच्या दिरासोबतच झाली फरार, नवऱ्याने दोघांचाही केला खून

पत्नीचे आपल्या भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता.

  • Share this:

गया (बिहार), 12 सप्टेंबर : बिहारमधील गया इथं एक मोठं हत्याकांड समोर आलं आहे. पत्नीचं दिरावर प्रेम झाल्याचा आरोप करत नवऱ्याने दोघांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे गयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचे आपल्या भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयातूनच आरोपीने पत्नीसह स्वत:च्या भावाचीही निर्घूण हत्या केली. तसंच त्यांना संपवल्यानंतर दोघांचे मृतदेह झाडाला बांधले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केली आहे.

टुली मांझी याच्या घरापासून जवळच असणाऱ्या शेतात गुरुवारी सकाळी एका झाडाला एक युवक आणि एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एकाच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याने आसपासच्या गावांतही खळबळ उडाली. बघता बघता तिथं शेकडो लोक जमा झाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

'मृत महिलेचं नाव लालती देवी तर पुरुषाचं नाव कुंदन उर्फ टेनी मांझी आहे. लालती देवी ही कुंदनसोबत एका आठवड्यापूर्वी फरार झाली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपी टुली मांझी याने पत्नी आणि युवकाची हत्या केली,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

धावत्या रेल्वेत चढू नका, या महिलेसोबत काय घडलं? पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...