'डोअर बेल खराब आहे, मोदी-मोदी अशी हाक मारा', मुस्लीम वस्तीत लागली पोस्टर्स

'डोअर बेल खराब आहे, मोदी-मोदी अशी हाक मारा', मुस्लीम वस्तीत लागली पोस्टर्स

हरियाणामधल्या अंबाला जिल्ह्यातल्या मुस्लीम वस्तीत पोस्टर्स लावण्यात आली आहेत. डोअर बेल म्हणजेच दाराची घंटी खराब आहे, कृपया दार उघडण्यासाठी मोदी - मोदी असं ओरडा, असं यावर लिहिलं आहे.

  • Share this:

अंबाला, 15 ऑक्टोबर : हरियाणामधल्या अंबाला जिल्ह्यातल्या मुस्लीम वस्तीत पोस्टर्स लावण्यात आली आहेत. डोअर बेल म्हणजेच दाराची घंटी खराब आहे, कृपया दार उघडण्यासाठी मोदी - मोदी असं ओरडा, असं यावर लिहिलं आहे.

अशी पोस्टर्स लावण्यामागे काय कारण आहे याबद्दल स्थानिकांशी बातचीत केली तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली. महाराष्ट्रासोबतच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी उमेदवार घरोघरी जातात आणि डोअरबेल वाजवतात. अशा उमेदवारांसाठी मुस्लीम वस्तीत संदेश देण्यात आलाय. तुम्ही डोअर बेल वाजवू नका कारण हे दार फक्त मोदी मोदी असं म्हटल्यावरच उघडेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

(हेही वाचा : Success Story : आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण आता तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट)

महिला मतदार खूश

तिहेरी तलाकला आळा घालणारं विधेयक आणल्यामुळे महिला मतदार पंतप्रधान मोदींवर खूश आहेत. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचं श्रेयही इथले मतदार मोदींनाच देतात. आयुष्यमान योजना, उजाला योजना यासारख्या योजनांमुळेही त्यांना भाजपलाच मत द्यायचं आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणी उमेदवाराने इथे येऊन मत मागू नये,असं त्यांचं म्हणणं आहे.

मुस्लीम वस्तीत मोदींच्या नावाची पोस्टर्स लागल्यामुळे हरियाणाच्या निवडणुकीत हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

===========================================================================================

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरेंचा पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 08:20 PM IST

ताज्या बातम्या