मराठी बातम्या /बातम्या /देश /पत्नीला चंद्र-तारे नकोत! 'या' पतीने नेमकं ओळखून केलं अनोखं काम, कौतुकासाठी शब्दही पडतील अपुरे

पत्नीला चंद्र-तारे नकोत! 'या' पतीने नेमकं ओळखून केलं अनोखं काम, कौतुकासाठी शब्दही पडतील अपुरे

या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमकं काय हवंत, हे कळून चुकलं. आणि आज त्याच्या कामाचं देशभरात कौतुक होतं आहे.

या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमकं काय हवंत, हे कळून चुकलं. आणि आज त्याच्या कामाचं देशभरात कौतुक होतं आहे.

या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमकं काय हवंत, हे कळून चुकलं. आणि आज त्याच्या कामाचं देशभरात कौतुक होतं आहे.

गुना, 11 जानेवारी : तुझ्यासाठी आकाशातून चंद्र-तारे तोडून आणेल असं अनेकदा प्रियकर किंवा पती आपल्या साथीदाराला म्हणत असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रेमात पाताळातून पाणी काढण्याबाबत पहिल्यांदाच ऐकलं असेल. ही कोणा पुस्तकातील कहाणी नाही, तर सत्य आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका सर्वसाधारण व्यक्तीने दशरथ मांझीची आठवण करुन दिली आहे. (husband dug a well in the house for his wife) दशरथ मांझीने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर 25 फूट डोंगर कापून रस्ता तयार केला होता. अशाच प्रकारे गुनामधील पतीने आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून एक अनोखं काम केलं आहे. अनेकदा पत्नीला नेमकं काय हवंत, हेच पतीच्या लक्षात येत नसल्याची महिलांची तक्रार असते. मात्र या पठ्ठ्याला आपल्या पत्नीला नेमकं काय हवंत, हे कळून चुकलं. आणि आज त्याच्या कामाचं देशभरात कौतुक होतं आहे.

गुना जिल्ह्यातील चाचौडा जनपदमधील भानपुर बाबा गावातील आहे, जेथे राहणाऱ्या 46 वर्षीय भरत सिंहने पत्नीचा त्रास दूर करण्यासाठी घरातच विहिर खोदली. भरत सिंह याची पत्नी सुशीलाबाई रोज 500 मीटर लांब जाऊन हँडपंपाने पाणी भरत होती. यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यातच एकेदिवशी हा हँडपंप खराब झाला. (husband dug a well in the house for his wife) त्यामुळे पत्नी चिडली, आणि पाण्याशिवाय घरी परतली. पत्नीला चिडलेल्या अवस्थेत पाहून भरत सिंहने घरातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. भरत सिंहने विलंब न करता फावडा घेतला आणि विहीर खोदायला सुरुवात केली. हे पाहून सुशीलबाई हसू लागली आणि तुम्हाला जमणार नाही असं म्हणत हिणवलं. पत्नीचे हे शब्द ऐकून भरत सिंहची हिंमत अधिक वाढली आणि तो विहीर खोदू लागला. 15 दिवसात भरतने पत्नीसाठी 31 फूट खोल आणि 4 फूट लांब विहीर खोदली. विशेष म्हणजे विहिरीला पाणीही लागलं. हे पाहून पत्नी खूश झाली. भरत सिंहने विहीर पक्की करुन घेतली आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व त्यातून पाणी भरतात. (husband dug a well in the house for his wife) जवळील गावातील नागरिकही भरत सिंहचं कौतुक करीत आहे. गुनाच्या कलेक्टरांनीही भरत सिंहचं कौतुक करीत पीएम आवास व अन्य योजनांअंतर्गत अन्य लाभ देणार असल्याचं सांगितलं.

याबद्दल जेव्हा भरतसिंह याच्या पत्नीला विचारलं तेव्हा ती म्हणाली क, पैशातून सर्व काही मिळत नाही. असं प्रेम करणारा पती केवळ नशीबवाल्यांना मिळतो. सुरुवातील माझा विश्वास नव्हता की त्यांना हे जमू शकेल. पण त्यांनी जिद्द, चिकाटीने हे करुन दाखवलं.

First published:
top videos

    Tags: Wife and husband