2004 ची लोकसभा निवडणूक विसरू नका, सोनिया गांधींचा मोदींना इशारा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून अर्ज भरला. त्यावेळी सोनियांनी 2004 च्या निवडणुकांची आठवण करून दिली आणि कुणीही अजिंक्य नाही, असा इशारा दिला.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 04:59 PM IST

2004 ची लोकसभा निवडणूक विसरू नका, सोनिया गांधींचा मोदींना इशारा

रायबरेली,11 एप्रिल : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून अर्ज भरला. त्यावेळी सोनियांनी 2004 च्या निवडणुकांची आठवण करून दिली आणि कुणीही अजिंक्य नाही, असा इशारा दिला.

इंडिया शायनिंग मोहिमेचा लाभ उठवत अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पुन्हा येईल, असा अंदाज होता. पण भाजपचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला, असं त्या म्हणाल्या.

सोनिया गांधींनी गुरुवारी म्हणजे ११ एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या धामधुमीमध्ये अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

इंडिया शायनिंग

नरेंद्र मोदींना हरवता येणं अवघड आहे का, असं पत्रकारांनी सोनियांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, 'असं अजिबात नाही. 2004 ची निवडणूक विसरू नका. अटलबिहारी वाजपेयी हेही अजिंक्य आहेत,असं वाटत होतं पण या निवडणुकीत आमचा विजय झाला.'

Loading...सोनिया एवढंच उत्तर देऊन पत्रकारांसमोरून निघून गेल्या पण मोदी अजिंक्य नाहीत हे त्यांनी पुन्हापुन्हा म्हटलं. त्यानंतर राहुल गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मोदींचा पराभव होणारच नाही हे गृहित धरणं चुकीचं आहे, असं राहुल गांधीही म्हणाले.

जनतेपेक्षा कुणीही मोठं नाही

सोनियांनी अर्ज भरला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही त्यांच्यासोबत होते. 'भारताचा इतिहास पाहिला तर असे खूप लोक आहेत ज्यांना आपण अजिंक्य आहोत, असं वाटत होतं. आपण भारताच्या जनतेपेक्षा मोठे आहोत, असाही त्यांचा समज होता पण जनतेपक्षा कुणीच मोठं असू शकत नाही, हे त्यांना कळलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. या निवडणुकीत मोदींची कसोटी लागेल, असा शेराही त्यांनी मारला.

राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशातलं अमेठी आणि केरळमधलं वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

===========================================================================================================================================================

VIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...