झाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेलातच टाकलं!; उत्तर प्रदेश पोलिसांचा 'गाढव'पणा

झाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेलातच टाकलं!; उत्तर प्रदेश पोलिसांचा 'गाढव'पणा

जेलच्या परिसरात येथील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काही रोपटी लावली होती. या रोपट्यांची आणि इतर झाडाझुडपांची या गाढवांनी नासधूस केली. म्हणून चिडून इथल्या जेलरने या गाढवांना अटक केली कैदेत डांबून ठेवलं. या गाढवांना एक दिवस दोन दिवस नाही तर तब्बल चार दिवस डांबून ठेवलं.

  • Share this:

जलाऊन ,27 नोव्हेंबर: भारतात चोरी केली ,नासधूस केली म्हणून माणसांना अटक केल्याच्या घटना घडतात. पण जे ल परिसरातल्या झाडाडुडपांची नासधूस केली म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क दहा गाढवांनाच अटक केली आहे.

ऐकून धक्का बसेल अशीही घटना आहे. उत्तर प्रदेशात उरई जिल्ह्यात जलाऊ इथे जिल्हा तुरूंग आहे. या जेलच्या परिसरात येथील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी काही रोपटी लावली होती. या रोपट्यांची आणि इतर झाडाझुडपांची या गाढवांनी नासधूस केली. म्हणून चिडून इथल्या जेलरने या गाढवांना अटक केली कैदेत डांबून ठेवलं. या गाढवांना एक दिवस दोन दिवस नाही तर तब्बल चार दिवस डांबून ठेवलं.

या गाढवांचा मालक कमलेश गाढवांना शोधत जेलपर्यंत आला. त्याने गाढवांना सोडा अशी मागणी केली.पण जेलरने काही सोडलं नाही. अखेर एका स्थानिक नेत्याच्या मदतीने त्याने अखेर आपल्या 10 गाढवांची सुटका करून घेतली.

त्यामुळे या देशात गाढवांनाही आता अटक होऊ शकते हे स्पष्ट झालं आहे.

Jalaun(UP): Police release a herd of donkeys from Urai district jail. They had been detained for destroying plants outside jail and were released after four days pic.twitter.com/Wl5UJrU2tT

— ANI UP (@ANINewsUP) November 27, 2017

First published: November 27, 2017, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading