'जगात पहिला क्रमांक माझा नंतर मोदींचा', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली चूक

'जगात पहिला क्रमांक माझा नंतर मोदींचा', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली चूक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी ते नवी दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे. 'माझ्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. मार्क झुकेनबर्गने नुकताच सांगितलं की फेसबुकवर लोकप्रियतेमध्ये माझा पहिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुसरा नंबर आहे.' अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमधून ते भारत दौऱ्यासाठी किती उत्सुक आहेत ते दिसून येत आहे. मात्र त्यांच्या या दाव्यामुळे सोशल मीडियापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत चर्चेला उधाण आलं आहे. अनेक युझर्सनी डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं आहे. तर ट्वीटरवर डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स सर्वात जास्त असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे.

हेही वाचा-इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसोबत भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार त्यांनी फेसबुक फॉलोअर्सच्या बाबतीत हे वक्तव्य केलं असाव असं युझर्सचं म्हणणं आहे. मात्र तरीही 2019मध्ये झालेल्या रँकिंगनुसार फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स आणि लोकप्रियता अधिक आहे त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर होते. 2019च्या अहवालानुसार त्यांचे फॉलोअर्स 44 मिलियन तर ट्रम्प यांचे केवळ 26 मिलियन फॉलोअर्स आहेत.

कसं असेल डोनाल्ड ट्रम्प यांचं नियोजन

24 फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विशेष विमानाने अहमदाबादला पोहोचणार आहेत.

त्यानंतर साबरमती आश्रमात जाणार आहेत. त्यांच्या हस्ते क्रिकेट ग्राउंट मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन करण्यात येईल.

25 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प पत्नीसह दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात येईल.

त्यांनंतर ते राजघाटावर महत्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी जाणार आहेत.

हैदारबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत.

हेही वाचा-20 किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूने मिळवलं ऑलिम्पिक तिकीट

First published: February 15, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading