राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केलेल्या डिनरला जाणार नाहीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह. आधी स्वीकारले होते निमंत्रण...
19:0 (IST)
आग्रा येथून दिल्लीला रवाना होण्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिली ताजमहालची प्रतिमा.
18:26 (IST)
आग्राहून दिल्लीला जाण्यासाठी विमानाने रवाना झाले डोनाल्ड ट्रम्प
18:25 (IST)
ताज महाल आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प
17:50 (IST)
ताजमहाल निहाळताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर
17:44 (IST)
व्हिजिटर्स बुकमध्ये अमेरिकन राष्ट्राघ्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले, "ताजमहाल, भारतीय संस्कृतीचे समृद्ध आणि विविधतेने नटलेले एक उत्तम चित्र आहे. धन्यवाद, भारत."
17:20 (IST)
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिला संदेश
16:56 (IST)
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यासोबत त्यांची कन्या इव्हिंका आणि जावई सुद्धा होते. 'ताजमहाल'चं सौंदर्य बघताच सगळेच भारावून गेले.
16:27 (IST)
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचं आग्र्यात आगमन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांच विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर ते जगप्रसिद्ध ताजमहल बघण्यासाठी जाणार आहेत.
14:38 (IST)
अहमदाबादमधल्या कार्यक्रमानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया हे जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देणार
अहमदाबाद 24 फेब्रुवारी: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. ड्रोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारतात राहणार आहेत. त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मेलेनिया, कन्या इव्हिंका आणि जावईही आले आहेत. अहमदाबादेत 'नमस्ते ट्रम्प' या भव्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार स्वागत केले.
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर भव्य कार्यक्रमात दीड लाख लोकांना नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सपत्नीक आग्रा येथील ताजमहालाला भेट दिली. ताजमहाल पाहून आपण भारवलो असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शाही डिनर आयोजित केले आहे.यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या शाही डिनरला जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. आधी त्यांनी निमंत्रण स्वीकारले होते. तर उद्या दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. या दौऱ्याची प्रत्येक बातमी आणि अपडेट 'न्यूज 18 लोकमत'वर तुम्हाला वाचायला मिळणार आहे.