भारत पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

भारत पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2019 01:30 PM IST

भारत पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'आता बस्स झालं' म्हणत पाकिस्तानविरोधातील आपली भूमिका अधिक कडक केली. सध्या भारतानं घेतली भूमिका पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याबाबत अमेरिकेनं दोन्ही देशांसोबत संपर्क साधला आहे. यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत लवकरच परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेत असल्याचं ट्रम्प यांनी ओवल येथे बोलताना सांगितलं. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीवर आपली नजर असल्याचं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पुलवामा हलल्यानंतर अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या NSAप्रमुखांनी भारताचे NSAप्रमुख अजित डोवाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. भारत सध्या पाकिस्तानची शक्य तितक्या मार्गाने नाकाबंदी करताना दिसत आहे.

मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढला

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर आर्थिक कोंडीचा बॉम्ब टाकला. सुरूवातीला भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा (MFN) दर्जा काढून घेतला. त्यानंतर पाकिस्तानातून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स इत्यादी पदार्थांवर कस्टम ड्युटी वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अवघ्या 20 तासातच भारताने मोठं पाऊल उचललं होतं.

Loading...

गॅट करारानुसार भारताने 1996 साली पाकिस्तानला हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा बहाल केला होता. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर हा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाच काढून घेतल्याने पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.

रावी नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय

दोन धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर आता पाकिस्तानला आता तिसरा धक्का दिला होता. मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 21 फेब्रुवारी रोजी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली होती.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला दणका

जगभरातून दबाव वाढत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला दणका बसला. सुरक्षा परिषदेत शुक्रवारी पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यासाठी भारताने जो प्रस्ताव मांडला होता त्याला चीनने पाठिंबा दिला. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे.

जगातल्या सर्व बड्या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानची निर्भत्सना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत शुक्रवारी या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावत पाकिस्तान मदत करत असलेल्या 'जैश ए मोहोम्मद' या संघटनेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.


VIDEO : Pulwama : 'खून का बदला लिया', नागपुरात मोदी-गडकरींचे पोस्टर्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...