ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला

ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला

'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना न थकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉलीवूडबाबत देखील भाष्य केलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील बॉलीवूडने भुरळ घातल्याचं दिसून येत आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याला सुरूवात झाली. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थिती दर्शवली. भारत दौऱ्यावर आलेले ते अमेरिकेचे सातवे राष्‍ट्राध्यक्ष अाहेत. डोनाल्‍ड ट्रम्प दोन दिवसांत 36 तास भारतात घालवणार आहेत. डोनाल्‍ड ट्रम्प यांच्यासोबत पत्‍नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump), कन्या इवांका ट्रम्प आणि जावई असून एक उच्‍चस्‍तरीय शिष्टमंडळ भारतात पोहोचलं आहे.

दरम्यान 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना न थकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉलीवूडबाबत देखील भाष्य केलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील बॉलीवूडने भुरळ घातल्याचं दिसून येत आहे. ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले की '2000 हून अधिक चित्रपटांची निर्मिती बॉलिवूड करते. बॉलीवूडमधील भांगडा, रोमान्स, म्युझिक जगभर प्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक प्रेक्षक बॉलीवूडमधील चित्रपट अत्यंत आनंदाने पाहतात'. विशेषत: ट्रम्प यांनी शोले आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटांचा उल्लेख केला. 'DDLJ आणि शोलेसारख्या क्लासिक फिल्म बॉलीवूडने बनवल्या' अशा शब्दात ट्रम्प यांनी बॉलीवूडचं कौतुक केलं आहे. DDLJ सारख्या रोमँटिक चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर मेलेनिया ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटलं.

या कार्यक्रमात सुमारे 1 लाख 10 हजार नागरिक उपस्थित आहेत. अमेरिकेतील ह्यूस्‍टनमध्ये झालेल्या 'हाउडी मोदी'च्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

First published: February 24, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या