Donald Trump India Visit : हॉट सुपरमॉडेल ते फर्स्ट लेडी! अशी झाली होती मेलेनिया आणि ट्रम्प यांची भेट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

  • Share this:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनियासह संपूर्ण परिवारसह दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत.

ट्रम्प आणि मेलेनिया अहमदाबादला दाखल झाले आहे. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील, यावेळी ट्रम्प ताजमहलला भेट देतील. ट्रम्प यांच्या भारतदौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्याचबरोबर सर्वांच्या नजरा आहेत त्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्यावर.

मॉडेल ते फर्स्ट लेडी असा मेलेनिया यांचा प्रवास फारच रंजक आहे. मेलेनिया लहान देशातून आल्या असल्या तरी त्यांची मॉडेल म्हणून कामगिरी वाखण्याजोगी होती.

मेलेनिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये स्लोव्हेनिया येथे झाला. मेलेनिया या एक स्लोव्हेनियन मॉडेल होत्या. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली.

1998 मध्ये न्यूयॉर्कमधील फॅशन वीक पार्टी दरम्यान मेलेनिया आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्यावेळी ट्रम्प राजकारणात नव्हते. मात्र रिअल इस्टेटमध्ये त्यांचे मोठे नाव होते.

डोनाल्ड ट्रम्प जेव्हा मेलेनियाला भेटले, त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते आणि दुसरी पत्नी मार्ला मॅपलपासून घटस्फोट होणार होता. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प 52 वर्षांचे होते आणि मेलेनिया 28 वर्षांचे होते.

मेलेनिया आणि ट्रम्प हे 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर 2004मध्ये साखरपूडा आणि 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांनी मेलानियाला 1.5 दशलक्ष डॉलर्स हिराच्या अंगठी दिली होती.

मेलानिया आणि ट्रम्प यांच्या लग्नात बिल गेट्स आणि हिलरी क्लिंटन यांनी हजेरी लावली होती. 2006मध्ये, मेलेनिया अमेरिकेची नागरिक झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.

2016मध्ये ट्रम्प अमेरिकेचे 45व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर मेलेनिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झाल्या. ट्रम्प यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर आतापर्यंत 23 देशांच्या दौर्‍या केल्या आहेत. भारत हा दक्षिण आशियातील दुसरा देश आहे.

भारतात येण्यासाठी मेलेनिया आणि ट्रम्प खूप उत्सुक होते. त्यांच्यासोबत मुलगी इव्हान्का आणि जावईही आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 12:28 PM IST

ताज्या बातम्या