मराठी बातम्या /बातम्या /देश /

हाउडी मोदीनंतर आता ‘हाउडी ट्रम्प’, ‘या’ व्यापार करारावर मोठ्या निर्णयाची शक्यता

हाउडी मोदीनंतर आता ‘हाउडी ट्रम्प’, ‘या’ व्यापार करारावर मोठ्या निर्णयाची शक्यता

अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे

अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे

अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे

    नवी दिल्ली, 18 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 2020 या वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार असून यामध्ये ट्रम्पही उमेदवार आहेत. ट्रम्प भारत दौऱ्यादरम्य़ान गुजरातमधील अहमदाबाद येथे उपस्थित राहणार आहे. हाउडी मोदी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येथे ते नागरिकांना संबोधित करतील. तीन दिवसाच्या भारतीय दौऱ्यात ट्रम्प दिल्लीसोडून भारताताही कोणत्याही एका शहराचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मुळत: गुजराती असलेले अमेरिकन नागरिक हाउडी ट्रम्प या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील अनेक नागरिक अमेरिकेत वास्तव्यास आहे. अमेरिकेतील राजकीय नेते  या जनसमुदायाकडे एक मोठा वोट बॅंक म्हणून पाहतात. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प व मोदी एका व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. या करारानुसार अमेरिकेतील कंपन्यांना भारतीय बाजारापर्यंत पोहोचणे वा त्यांच्यासोबत व्यवहार करणे अधिक सोपं होणार आहे. याबरोबर मुक्त व्यापार करारावरही यावेळी चर्चा होणार आहे. अमेरिका एक महासत्ताक देश आहे. 2020 मध्ये अमेरिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे यंदाच्या टर्ममध्ये ट्रम्प पुन्हा निवडून येतील की नाही याकड़े जगातील सर्व मोठ्या देशांचे लक्ष लागले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ahamadabad, American president donald trump, BJP narendra modi, Trump 2020

    पुढील बातम्या