भारतावर पुन्हा का भडकले डॉनल्ड ट्रम्प ?

भारतावर पुन्हा का भडकले डॉनल्ड ट्रम्प ?

भारताने अमेरिकी उत्पादनांवर कर लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प पुन्हा संतापले आहेत. भारत हा सर्वाधिक कर लादणारा देश आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन,4 एप्रिल : भारताने अमेरिकी उत्पादनांवर कर लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प पुन्हा संतापले आहेत. भारत हा सर्वाधिक कर लादणारा देश आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याआधीही ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेवर लावलेल्या कराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

अमेरिकेमधल्या हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलसह 100 उत्पादनांवर भारताने कर लावला आहे. पण एवढा कर योग्य नाही, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलींचं आयात शुल्क 100 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय भारताने घेतला होता. त्याबदद्ल ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पण त्याआधी ट्रम्प यांनी उपहासाने भारताला 'टेरिफ किंग' ही उपाधीही दिली होती.

मोदींनी केला फोन

मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता, असं नमूद करून ट्रम्प म्हणाले, 'भारत जगातला सगळ्यात जास्त कर लादणारा देश आहे. त्यांनी अमेरिकेकडून 100 टक्के कर घेतला. अमेरिका भारताकडून असा कोणताही कर घेत नाही. आम्ही हार्ले डेव्हिडसन मोटरसायकली भारतात पाठवतो पण ते आमच्याकडूनच पैसे घेतात. 100 टक्के कर हा काही योग्य नाही.'

भारत सोडून अन्य देशांशी आमची व्यापारविषयक बोलणी चांगली चालली आहेत.चीनशीही आमचा चांगला व्यापार चालला आहे, असा उल्लेखही ट्रम्प यांनी केला.

चीनने गेल्या वर्षी अमेरिकेतून आयात होणारं पोलाद आणि अॅल्युमिनियमवर भरपूर कर लावला होता. त्यावरून अमेरिका आणि चीनचं व्यापारयुद्ध सुरू झालं होतं. पण आता मात्र ट्रम्प यांनी चीनला प्रशस्तिपत्र देऊन भारताला टोला मारला आहे.

डॉनल्ड ट्र्म्प यांच्या या नव्या टिप्पणीवर भारत काय प्रतिक्रिया देतो हे पाहावं लागेल.

=================================================================================================================================================================

प्रियांका गांधींनी उचलले जखमी कॅमेरामॅनचे बूट, VIDEO व्हायरल

First published: April 4, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading