मराठी बातम्या /बातम्या /देश /

GOOD NEWS! या तारखेपासून पूर्ण क्षमतेने हवाई वाहतूक, आता करू शकाल तुमच्या प्रवासाचा प्लॅन

GOOD NEWS! या तारखेपासून पूर्ण क्षमतेने हवाई वाहतूक, आता करू शकाल तुमच्या प्रवासाचा प्लॅन

कोरोना काळापासून मर्यादित स्वरुपात चालवली जाणारी विमान वाहतूक 18 ऑक्टोबरपासून (Domestic flights to operate with full capacity from 18 October) पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा विमान वाहतूक मंत्रालयानं केली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : कोरोना काळापासून मर्यादित स्वरुपात चालवली जाणारी विमान वाहतूक 18 ऑक्टोबरपासून (Domestic flights to operate with full capacity from 18 October) पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा विमान वाहतूक मंत्रालयानं केली आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विमानाने (Good news in festive season) प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोरोना उद्रेकानंतर केंद्र सरकारनं स्थानिक विमानफेऱ्यांमध्ये कपात केली होती. मात्र आता कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्यामुळे आता विमानसेवा पूर्ववत (Declining corona cases) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्ण क्षमतेने उडणार विमानं

18 ऑक्टोबर 2021 पासून विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 72.5 टक्के क्षमतेनं विमान वाहतूक सुरू आहे. 18 तारखेपासून ती 85 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमान वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा निर्णय़ घेतानाच कोरोनाविषयक नियमांचं कडक पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची असणार आहे.

ऑगस्टपासून वाढतेय प्रवाशांची संख्या

ऑगस्ट महिन्यापासून विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरात 57,498 विमानफेऱ्या झाल्या होत्या आणि त्यातून 65,26,753 जणांनी प्रवास केला होता. जुलैमधील प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या तब्बल 33 टक्के अधिक होती. देशातील कोरोनाचे आकडे कमी होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून टप्याटप्याने विमानांच्या फेऱ्या वाढवायला सुरुवात झाली होती. आता दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर यात अधिकच वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 21 जून आणि 13 ऑगस्ट रोजी सरकारने विमानफेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचा - सोलापुरात महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात; लेक गायब असल्यानं गूढ वाढलं

15 दिवसांत भाडे निश्चित करण्याची सूचना

विमान कंपन्यांनी नव्या फेऱ्यांसाठीचे विमान भाडे पुढील 15 दिवसांत निश्चित करावे, अशा सूचना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने दिल्या आहेत. महिन्यातील 15 दिवस विमान कंपन्या या स्वतःचं भाडं आकारतात, तर उरलेले 15 दिवस सरकारनं निश्चित केलेल्या अटीनुसार दर आकारणं विमान कंपन्यांवर बंधनकारक असतं.

First published:

Tags: Domestic flight, Festival