S M L

विनाअनुदानित सिलेंडर 73.50 रुपयांनी महागला

तर अनुदानित सिलेंडरच्या दरात 7.23 रुपये वाढ करण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2017 05:19 PM IST

विनाअनुदानित सिलेंडर 73.50 रुपयांनी महागला

01 सप्टेंबर :  सर्वसामन्यांच्या खिश्याला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. आज 1 सप्टेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 73.50 रुपयांनी वाढ करण्यात आलीये. तर अनुदानित सिलेंडरच्या दरात 7.23 रुपये वाढ करण्यात आलीये.

पेट्रोलियम कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी या प्रत्येक 15 दिवसाला इंधन दराचं परीक्षण करत आहे. मागील महिन्यात 1 जुलैला पेट्रोलियम कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात 32 रुपये कपात केली होती. देशात सध्या 18.11 कोटी अनुदानित सिलेंडराचा लाभ घेत आहे. तर 2.66 कोटी लोकं विनाअनुदानित सिलेंडरचा वापर करत आहे.

प्रत्येक महिन्याला वाढणार 4 रुपयेगॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्याकडून महिन्यापूर्वी घेण्यात आला. लोकसभेमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्याला सिलेंडरच्या दरात 4 रुपये वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिलीये. आता पुढील वर्षी मार्चपर्यंत सिलेंडरवर अनुदान देणे बंद करण्यात येणार आहे.

मुंबईत गॅस सिलेंडर कितीला मिळणार ?

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्यामुळे मुंबईत आता 14.2 किलोचं सिलेंडर अनुदानित सिलेंडर  442 रुपयांना मिळणार आहे. तर विनाअनुदानित सिलेंडर 502.50 रुपयांना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 05:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close