मराठी बातम्या /बातम्या /देश /या गावात कुत्र्याची दहशत, घराबाहेर पडणंही अवघड; 2 तासात 40 जखमी

या गावात कुत्र्याची दहशत, घराबाहेर पडणंही अवघड; 2 तासात 40 जखमी

कुत्र्यांची दहशत

कुत्र्यांची दहशत

रस्त्यावरील मोकाट कुत्री अनेकदा वाहनांच्या मागे धावतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना जखमी केल्याच्या घटना ऐकायला मिळतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 30 डिसेंबर : रस्त्यावरील मोकाट कुत्री अनेकदा वाहनांच्या मागे धावतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना जखमी केल्याच्या घटना ऐकायला मिळतात. काही प्रकरणांमध्ये तर कुत्र्यांनी लहान मुलांचा जीव घेतल्याचंही समोर आलं होतं. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर अनेकदा अपघातही होतात. आता पुन्हा राजस्थानातील एका गावात मोकाट कुत्र्याने दहशत माजवली आहे. या कुत्र्याने अवघ्या एका तासात तब्बल 40 जणांना चावून जखमी केलं आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

  राजस्थानमधील बाडमेरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकापाठोपाठ एक कुत्रा चावण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता कल्याणपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तासाभरात भटक्या कुत्र्याने चावा घेऊन 40 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं. दरम्यान, कुत्र्याच्या दहशतीमुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

  हेही वाचा -  दारुच्या व्यसनाला कंटाळले कुटूंब; पत्नी आणि मुलाचं भयानक कृत्य

  मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणपुरा येथील मानक हॉस्पिटलजवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकामागून एक 40 जणांना चावा घेऊन जखमी केलं. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात आणलं असता व्यवस्थापनही चक्रावले. त्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ नगर परिषदेला देण्यात आली आणि कुत्र्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने भटक्या कुत्र्याला पकडण्यात आलं.

  नगर परिषदेने आता शहरातील विविध भागातील भटकी कुत्री पकडण्याची योजना तयार केली आहे. अचानक भटक्या कुत्र्याने चावलेल्या अनेक जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बीएल मन्सूरिया यांनी सांगितलं.

  हेही वाचा - आलियाच नाही, तर सिंहालाही सिल्की केसांचं वेड, पाहा व्हिडीओ

   त्याचबरोबर हा पिसाळलेला कुत्रा शहरातील अनेक भागात फिरतोय आणि त्याने शहरात विविध ठिकाणी अनेक जणांना चावून जखमी केलं आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत नगर परिषदेला अनेकदा सांगण्यात आले, मात्र कुत्र्याला पकडण्याबद्दल कारवाई झाली नाही, त्यामुळे ही मोठी घटना घडली, असं नागरिकांचं म्हणणं आहे. कुत्र्याला वेळीच न पकडल्यामुळे नागरिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

  दरम्यान, सध्या या कुत्र्याला प्रशासनाने पकडलं आहे. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्रा पिसाळलेला असल्यामुळे जखमींवर त्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. कुत्र्याने चावा घेतलेल्या कुणाचीही प्रकृती गंभीर नाही.

  First published:

  Tags: Rajasthan, Viral, Viral news