PM मोदींनी मन की बातमध्ये उल्लेख केलेल्या श्वानाचा मृत्यू, मालकाने सोडल्यानंतर पोलिसांनी केला होता सांभाळ

PM मोदींनी मन की बातमध्ये उल्लेख केलेल्या श्वानाचा मृत्यू, मालकाने सोडल्यानंतर पोलिसांनी केला होता सांभाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचा मन की बात (Mann ki Baat) कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील लोकांचा प्रेरणादायी घटना सांगत असतात. गेल्या रविवारी त्यांनी या कार्यक्रमात त्यांनी एका श्वानाचा देखील उल्लेख केला होता.

  • Share this:

मेरठ, 03 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचा मन की बात (Mann ki Baat) कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील लोकांचा प्रेरणादायी घटना सांगत असतात. गेल्या रविवारी त्यांनी या कार्यक्रमात त्यांनी एका श्वानाचा देखील उल्लेख केला होता. राकेश असं या कुत्र्याचं नाव असून किडनी आणि लिव्हरच्या त्रासामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मूळ मालकाने सोडून दिल्यानंतर PAC कॉन्स्टेबल्सनी या 5 वर्षाच्या कुत्र्याची देखभाल केली होती. मृत्यूनंतर देखील त्याला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला असून सन्मानपूर्वक त्याच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले.

गेल्य रविवारी पंतप्रधान मोदी यांनी या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात लोकं इतरांची काळजी घेत असल्याचे नमूद केलं. या काळात रस्त्यावरील नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्तींचे त्यांनी आभार मानले होते. गरजू लोकांना नागरिक मदत करताना दिसून येत असल्याचा आनंद आहे. त्याचबरोबर भटक्या प्राण्यांना आणि कुत्र्यांना देखील नागरिक मदत करत आहेत. याचा आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात म्हटले होते.

दरम्यान कोरोनाच्या (Covid 19) संकटकाळात या कुत्र्याच्या मालकाने त्याला सोडून दिलं होत. त्याचा मालक चहाची टपरी चालवत होता. परंतु लॉकडाउनच्या काळात त्याला गावाला जावं लागल्यानं त्याने आपल्या कुत्र्याला तिथेच सोडून दिलं. त्यानंतर उपनिरीक्षक उमेश सिंग यांच्यासह पीएसी कर्मचार्‍यांनी त्या कुत्र्याची देखभाल करण्याचं ठरवलं. त्यांनी चहाच्या दुकानातील मालकाच्या नावावरुन त्याचं नाव देखील राकेश ठेवलं होतं. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कुत्र्याची काळजी घेतल्याबद्दल पोलिसांचं कौतुक केलं होतं.

(हे वाचा-HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! RBI ने थांबवल्या बँकेच्या डिजिटल सेवा)

मीडिया अहवालानुसार, पोलीस कर्मचार्‍यांना गेल्या काही महिन्यांत राकेशचा लळा लागला होता. काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला होता आणि आजारातून बरा होऊ शकला नाही. त्यानंतर या आजारामुळे राकेशचं निधन झाल. पीएसीच्या जवानांनी पूर्ण सन्मानाने त्याला अलविदा केलं.

ऑगस्टमध्येही पंतप्रधान मोदींनी (PM Modi had lauded army dogs) लष्कराच्या श्वानांचे देश सुरक्षित ठेवण्याच्या आणि भारतीय सैन्याला मदत करण्याबद्दल कौतुक केले होते. स्वातंत्र्यदिनी सोफी आणि विडा या आर्मीच्या श्वानांना  'प्रशंसापत्र' देखील देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी 'मन की बात' मधील भाषणात उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वी केलेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी  देशवासीयांना देखभाल करण्यास सोपी असलेल्या निष्ठावान भारतीय जातीच्या श्वानांचे पालन करण्याचे देखील आवाहन केले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 3, 2020, 3:38 PM IST
Tags: pm modi

ताज्या बातम्या