Home /News /national /

कुत्रा माणसाला चावला, मग माणूस कुत्र्याला चावला! दोघेही पोहोचले हॉस्पिटलमध्ये आणि मग...

कुत्रा माणसाला चावला, मग माणूस कुत्र्याला चावला! दोघेही पोहोचले हॉस्पिटलमध्ये आणि मग...

एक कुत्रा माणसाला चावल्यानंतर (Dog bites man and man bites him back) माणूसही कुत्र्याला चावल्याची घटना समोर आली आहे.

    पटना, 19 ऑक्टोबर : एक कुत्रा माणसाला चावल्यानंतर (Dog bites man and man bites him back) माणूसही कुत्र्याला चावल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने एक कुत्रा (Pet bites youth) पाळला होता. मात्र घटनेच्या दिवशी या कुत्र्याने तरुणाचा चावा घेतला. आपल्या कुत्र्याने आपलाच चावा घेतल्याचं सहन न झाल्यामुळे चिडलेल्या (Dog injured due to youth bite) तरुणाने कुत्र्याचा चावा घेत त्याला जखमी केलं. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी तो कुत्र्याला बाईकवर घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अगोदर कुत्रा चावला बिहारच्या गोपालगंजमध्ये राहणाऱ्या 26 वर्षांच्या मन्नू मांझी नावाच्या तरुणाने एक कुत्रा पाळला होता. त्याला कुत्र्यांची आवड असल्यामुळे लहानपणापासून तो कुत्रा पाळत होता. अलिकडेच त्याने हा कुत्रा घरी आणला होता. मात्र या कुत्र्याने एक दिवस मन्नूचा करकचून चावा घेतला. कुत्र्याचे दात लागल्यामुळे जखमी झालेल्या मन्नूचा राग अनावर झाला. त्याने कुत्र्याला धडा शिकवायचं ठरवलं. तरुण कुत्र्याला चावला कुत्रा चावल्याचा असह्य राग आल्याने तरुणाने कुत्राला पकडले आणि त्याचा जोरदार चावा घेतला. तरुणाचे दात लागल्यामुळे कुत्रादेखील जखमी झाला आणि विव्हळू लागला. रागाचा पारा थंड झाल्यानंतर तरुणाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो कुत्राला बाईकवर घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आपल्या कुत्र्याला कडेवर घेऊन तो अस्वस्थपणे येरझारे घालू लागला. हे वाचा- दिवसाढवळ्या भर रस्त्यात गोळीबार, पुन्हा सक्रीय होतायत टोळ्या हॉस्पिटल प्रशासनाची तारांबळ कुत्र्याला लवकरात लवकर उपचार मिळावेत, यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणाला हॉस्पिटलच्या स्टाफनं समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला डॉक्टरांनाच भेटण्याची इच्छा होती. अखेर डॉक्टरांनीच त्याची समजूत काढली. तरुणाला रेबिजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून आणि त्याला औषधं देऊन शांत केलं. कुत्र्याला प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. हा सल्ला पटल्यानंतर तरुण शांत झाला आणि कुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या हॉस्पिटलकडे रवाना झाला. या घटनेची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Dog

    पुढील बातम्या