मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होते? नव्या संशोधनानंतर समोर आली 'ही' माहिती

मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होते? नव्या संशोधनानंतर समोर आली 'ही' माहिती

मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होते का, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या व्हायरसबाबत लोकांच्या मनात विविध प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे या प्रश्नांबाबत जगाच्या कानाकोपऱ्यात संशोधन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सतत नवनवी माहिती समोर येत आहे. मच्छर चावल्याने कोरोनाची लागण (Coronavirus) होते का, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जात आहे. आता अखेर संशोधनानंतर याबाबतची माहिती समोर आली आहे.

मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होत नाही, असं नव्या संशोधनातून समोर आलं आहे. याआधी जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) अशीच माहिती दिली होती. या माहितीवर आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्यामुळे अनेकांच्या मनातील संशय दूर झाला आहे.

संशोधनातून आणखी कोणती माहिती मिळाली?

अमेरिकेतील एका विद्यापीठाने कोरोना व्हायरस आणि मच्छर यासंबंधीचं संशोधन केलं. या संशोधनातील माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग पसरवणारा SARS-CoV-2 व्हायरस मच्छर चावल्याने होत नाही. एडीज एजिप्टी, एडीस अल्बोपिक्टस आणि क्यूलेक्स क्विनकॅफॅसिअसस या मच्छरांच्या तीन प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. मच्छरांच्या या तीनही प्रजाती चीनमध्ये असून कोरोनाचा प्रादुर्भावही चीनमधून सुरू झाला होता.

वातावरणाचा कोरोनावर परिणाम होतो?

COVID-19 हा व्हायसर दमट वातावरणासह इतरही सर्व वातावरणात पसरतो. त्यामुळे तुम्ही कुठे प्रवास करत असाल तर योग्य ती काळजी घ्या, असं WHO ने सांगितलं आहे. अशी काळजी घेतल्यास तुम्हाला कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होऊ शकतो. नव्या वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट होईल, हा लोकांचा गैरसमज असल्याचंही WHO ने स्पष्ट केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 18, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या