माणुसकीला काळिमा : सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला लागल्या मुंग्या

माणुसकीला काळिमा : सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला लागल्या मुंग्या

या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. या अक्षम्य दुर्लक्षामुळे सिव्हिल सर्जनसह 5 डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

शिवपुरी (मध्य प्रदेश), 16 ऑक्टोबर : रुग्णालयात विशेषतः शासकीय रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे किंवा अन्य काही कारणाने रुग्णांकडे तातडीने लक्ष दिलं जात नसल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. पण मध्य प्रदेशात एका सरकारी रुग्णालयात दाखल झालेला एक रुग्ण दगावला. याविषयी डॉक्टरांना माहिती देऊनही या घटनेकडे लक्ष द्यायला कुणी वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर आले नाहीत.कित्येक तास मृतदेह तसाच वॉर्डमध्ये पडून होता. अखेर त्याला मुंग्या यायला लागल्यावर आजूबाजूच्या रुग्णांनीच तक्रार केली.तेव्हा कुठे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतली.

मध्य प्रदेशात एका जिल्हा रुग्णालयात घडलेली ही घटना आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री कमल नाथ यांनी दिले आणि या रुग्णालयातल्या 5 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. शिवपुरीच्या रुग्णालयात दाखल झालेल्या 51 वर्षांच्या भालचंद्र लोधी यांनी अखेरचा श्वास घेतला, तरीही डॉक्टर फिरकले नाहीत. डोळ्यांजवळ मुंग्या यायला लागल्या तेव्हा त्यांच्या बायकोनंच त्या हटवल्या.

अखेर आजूबाजूच्या रुग्णांनी याविषयी आरडाओरडा केल्यानंतर डॉक्टरांनी दख घेतली. मध्य प्रदेशात शिवपुरी जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला.

हा VIDEO पाहा  - अपघातानंतर रस्त्यावर पडली होती महिला,तिच्यावरून गेली अजून एक गाडी

लोधी यांना क्षयरोग झाला होता. उपचारांसाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. पण त्यांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांनी लक्ष देण्यास एवढा उशीर केला.  या घटनेची दखल थेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी घेतली आणि तातडीने चौकशीचे आदेश दिले. सिव्हिल सर्जनसह 5 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.

हे अत्यंत असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असल्याचं कमल नाथ यांनी म्हटलं आहे. त्यांनी या घटनेच्या तातडीने चौकशीचे आदेश दिले. या आदेशानंतर नेमलेल्या चौकशी समितीने कामावर असलेल्या डॉक्टरांना जबाबदार धरून पाच जणांचं निलंबन केलं आहे. शिवपुरी जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनसह 5 डॉक्टरांचं निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

------------------------------------------------

आणखी बातम्या

राहुल गांधींचा 'खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया'चा Video होतोय तुफान Viral

सुप्रीम कोर्टात 'हाय होल्टेज ड्रामा', मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला नकाशा

VIDEO: दबक्या पावलांनी केला वार, पाहा दोन वाघांमधील लढाईचा थरार

ICICI बँकेचा खातेदारांना Alert; ही काळीजी घ्या, नाहीतर अकाऊंट होईल खाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या