Home /News /national /

डॉक्टर म्हणाले मृत्यू झाला, दफनविधीची तयारी सुरु असतांनाच तरुणी झाली जिवंत

डॉक्टर म्हणाले मृत्यू झाला, दफनविधीची तयारी सुरु असतांनाच तरुणी झाली जिवंत

त्याच दरम्यान अस्माची हालचाल सुरु झाली. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कुटुंबीयांचा तर विश्वासच बसत नव्हता.

    मिरत 27 ऑगस्ट: मृत्यूच्या दारातून परत येणाऱ्या म्हणजेच संकटातून वाचविणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र डॉटक्टरांनी मृत्यू झाला असं जाहीर केलं. कुटुंबीयांनी दफनविधीची तयारी सुरु केली आणि तरुणी जिवंत झाली असं शक्य वाटत नसलं तरी हे घडलंय ते उत्तर प्रदेशात. एक 20 वर्षांची तरुणी अचानक बेशुद्ध झाली. डॉक्टरांन तिला मृत घोषीत केलं. त्यानंतर ती अचानक जिवंत झाली. मात्र 12 तासानंतर पुन्हा तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या कुटुंबाला दु:ख, आनंद आणि पुन्हा दु:खाचा सामना करावा लागला. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशातल्या मिरत जवळच्या मवाना या गावातली ही घटना आहे. इथे अस्मा नावाची 20 वर्षांची तरुणी अचानक बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेलं तेव्हा डॉक्टरांनी तिला कावीळ झाल्याचं सांगितलं. त्यानंतर उपचार  सुरु असतांनाच तिचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषीत केलं. त्यानंतर अस्माच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दफनविधीची तयारीही सुरु होती. स्मशानभूमित खोदकामही झालं होतं. मात्र त्याच दरम्यान अस्माची हालचाल सुरु झाली. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कुटुंबीयांचा तर विश्वासच बसत नव्हता. कर्मचाऱ्याचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख; प्लेन केलं बुक नंतर अस्मा उठून बसली. नंतर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये ती 12 तास राहिली. त्यानंतर मात्र तिच्या रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण एकदम कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यानंत तिचा मृत्यू झाला. '...तर लोक एकाच समाजाला दोष देतील', मोहरमच्या मिरवणुकींना सुप्रीम कोर्टाचा नकार मात्र अस्माचं पुन्हा जिवंत होणं याची चर्चा सगळ्या गावामध्ये सुरु असून नेमकं काय झालं असावं असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांना पडला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या