मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कायदायक जिवाशी खेळ! डॉक्टर बायको आजारी पडली, तर नवराच झाला रुग्णांसाठी डॉक्टर

धक्कायदायक जिवाशी खेळ! डॉक्टर बायको आजारी पडली, तर नवराच झाला रुग्णांसाठी डॉक्टर

एखाद्या डॉक्टर पत्नीच्या (Doctor Husband) जागेवर तिच्या नवऱ्यानं काम केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल. मात्र, असा धक्कादायक प्रकार एके ठिकाणी उघडकीस आला आहे.

एखाद्या डॉक्टर पत्नीच्या (Doctor Husband) जागेवर तिच्या नवऱ्यानं काम केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल. मात्र, असा धक्कादायक प्रकार एके ठिकाणी उघडकीस आला आहे.

एखाद्या डॉक्टर पत्नीच्या (Doctor Husband) जागेवर तिच्या नवऱ्यानं काम केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल. मात्र, असा धक्कादायक प्रकार एके ठिकाणी उघडकीस आला आहे.

चुरू, 28 मे : आपल्याकडं महिलांना निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी आरक्षण देऊन त्यांना पुढं आणलं जातं. मात्र, निवड झाल्यानंतर त्यांचा कारभार मात्र त्यांचे पतीच करत असल्याचे आपण पाहिले असेल. अनेक ठिकाणी बायकोच्या नावावर त्यांचे पती कारभार चालवत असतात. पण एखाद्या डॉक्टर पत्नीच्या (Doctor Husband) जागेवर तिच्या नवऱ्यानं काम केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल. मात्र, असा धक्कादायक प्रकार एके ठिकाणी उघडकीस आला आहे.

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कित्येक दिवसांपासून प्रभारी महिला डॉक्टर गैरहजर होत्या. बरेच दिवस होऊन देखील त्या कामावर येत नसल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावरही आपला राग व्यक्त केला. काहींनी तर डॉक्टर गैरहजर असल्याचे फेसबुक लाईव्ह करून दाखवलं. लाईव्ह करून या आरोग्य केंद्रात नवीन डॉक्टर नर्स भरण्याची मागणी करण्यात येऊ लागली.

हे वाचा - प्रियकराच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास विवाहितेनं दिला नकार; दगडाने ठेचून हत्या

त्यानंतर मात्र, एक जण येते आपण डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णांना तपासण्याचं काम करू लागला. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून येथील प्रभारी डॉक्टर मोनिका शर्मा यांचे पती होते. पण ते डॉक्टर नसताना डॉक्टरचे पती आहेत म्हणून त्यांच्या जागी येऊन काम करत असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. लोकांनी विचारले असता त्यांनी मॅडम आजारी आहेत, त्यामुळं आपण काम करत असल्याचे सांगितलं.

हे वाचा - अल्पवयीन मुलानं केली मित्राची निर्घृण हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

हा सर्व प्रकार राजस्थानमधील चूरू येथे घडला आहे. गावकऱ्यांनी आरोप केला की, गेले काही दिवस डॉक्टरांचा पती रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांचा डॉक्टरच्या कामाचा कोणताही अनुभव नसताना ते रुग्णांवर उपचार करत आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला. याबाबत काही सज्ञान नागरिकांनी उपविभागीय अधिकारी मोनिका जाखड यांना याबाबत माहिती दिली. तरीही त्यांच्याकडून कोणती विशेष कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, शेवटी गावकऱ्यांनी बनवलेला एक व्हिडिओ जिल्हाधिकारी सावरमल वर्मा यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मात्र त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत तत्काळ या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona updates, Rajasthan