Home /News /national /

आम्ही कोरोनाला घाबरलो तर रुग्णांची सेवा कोण करेल? डॉक्टराने व्यक्त केली भावना

आम्ही कोरोनाला घाबरलो तर रुग्णांची सेवा कोण करेल? डॉक्टराने व्यक्त केली भावना

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या जिद्दीला सलाम

    पाटना, 23 मार्च : संसर्गाची भीती वाटते. मात्र तरीही आयसोलेशन विभागात रुग्णांची सेवा करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला मी प्रत्येकाला देत असतो. मास्क, सेफ्टी किट्स, ग्लोव्ज इ. परिधान केल्यावर आमची संपूर्ण टीम कोरोना विषाणूचे संशयित आणि सामान्य रूग्णांची सेवा करण्यात काहीच फरक करत नाही, असं म्हणणं आहे पीएमसीएचमधील कोरोना आयसोलेशन विभागाचे नोडल प्रभारी डॉ. पूर्णानंद झा यांच. डॉ. पूर्णानंद म्हणाले की, नोडल अधिकारी म्हणून ते कोरोनापासून घाबरलेल्या रूग्णांना शांत ठेवण्यासाठी त्यांचे समुपदेशन तसेच वैद्यकीय कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देतो. ते रोज टीमला सांगतात की, कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी आपण देशाची सेवा करीत आहेत. संबंधित - कोरोना तपासण्यांची क्षमता लवकरच 100 हून 2200 पर्यंत; अमित देशमुखांची माहिती घरापेक्षा हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ घालवतो ते म्हणाले की, कोरोनाच्या संशयितांची संख्या वाढली असल्याने अधिकतर वेळ रुग्णालयात घालवला जातो. बर्‍याच वेळा झोपायला पुरेसा वेळही मिळत नाही. तरीही, आयसोलेशन विभागातील कोणताही डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी कंटाळा करीत नाही. सर्व रूग्णांना स्वतःचं मानून त्यांच्यावर उपचार केले जातात.  दिवस किंवा रात्री पीडितांना कोणत्याही प्रकारची गरज भासू नये याची काळजी घेतली जात आहे. नमुना गोळा करणार्‍यांना खबरदारी घेण्याचा सल्ला डॉ. पूर्णानंद म्हणतात की, कोरोनाची बातमी ऐकताच माझ्या कुटुंबातील लोक काळजीत आहेत. मात्र मला इथं रुग्णांची सेवा करायची आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम अत्यंत जिकरीचे आहे. नमुने घेताना कोणता रुग्ण संक्रमित आहे वा नाही याची माहिती नसते. अशा परिस्थितीत दक्षता हे एकमेव संरक्षण आहे. कोरोनापासून राज्याचा बचाव करण्यासाठी पीएमसीएचची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जर आपल्याला याची भीती वाटत असेल तर सामान्य माणसाला कोण वाचवेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या