नवी दिल्ली, 14 जून : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचे पडसाद आता देशभर पाहायाला मिळत आहेत. मुंबई, नवी दिल्ली, औरंगाबाद, बंगळुरूमध्ये डॉक्टरांनी आंदोलनाची सुरू केलं आहे. त्यामुळे रूग्णांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी देखील मारहाणीचा निषेध केला आहे, दिल्लीतील AIIMSमधील डॉक्टरांनी हेल्मेट घालून रूग्णांची तपासणी केली. त्यांनी अनोख्या पद्धतीनं या मारहाणीचा निषेध केला.
Delhi: Members of Resident Doctors' Association of All India Institute of Medical Sciences (AIIMS) continue to work wearing helmets, as a mark of protest against "worsening of violence against medical doctors in West Bengal." pic.twitter.com/6vAlBdFfPd
पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता मुंबई, दिल्लीमध्ये देखील दिसून येत आहेत. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ आता मुंबई, पंजाब, दिल्ली, केरळ, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेशमधील डॉक्टारांनी काम करायला नकार दिला आहे.
रूग्णालयामध्ये गर्दी
डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनामुळे हॉस्पिटलमधील रूग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रूग्णालयामध्ये गर्दी होत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील डॉक्टरांनी देखील पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. मुंबईसह देशात देखील यापूर्वी डॉक्टरांवर हल्ले झालेले आहेत. पण, आता पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध देशभरातून केला जात आहे.
ममतांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या इशाऱ्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी चार तासामध्ये उपोषण संपवण्याचा अल्टिमेटम दिला होता. तर, डॉक्टरांनी ममता बॅनर्जींवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
VIDEO : नाशिक सशस्त्र दरोड्यावर विश्वास नांगरे-पाटलांची प्रतिक्रिया