मराठी बातम्या /बातम्या /देश /

रुग्ण पाहात होता बिग बॉस शो आणि डॉक्टरनं केली ओपन ब्रेन सर्जरी

रुग्ण पाहात होता बिग बॉस शो आणि डॉक्टरनं केली ओपन ब्रेन सर्जरी

मेंदूची सर्जरी करणं जोखमीचं काम असतानाही रुग्णाला जागं ठेवून ते यशस्वीरित्या करणं आव्हान आहे.

मेंदूची सर्जरी करणं जोखमीचं काम असतानाही रुग्णाला जागं ठेवून ते यशस्वीरित्या करणं आव्हान आहे.

मेंदूची सर्जरी करणं जोखमीचं काम असतानाही रुग्णाला जागं ठेवून ते यशस्वीरित्या करणं आव्हान आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

गुंटूर, 22 नोव्हेंबर : व्हायोलिन वाजवताना किंवा रुग्णासोबत बोलत शस्त्रक्रिया यशस्वी केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील पण गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करणं तसं जोखमीचं असतानाही रुग्णाला आवडता शो पाहायला देणं आणि शस्त्रक्रिया करणं हे जरा जास्त कठीण आहे. ही लिलया पार पाडली अगदी यशस्वीपणे डॉक्टरांनी पार पाडली आहे.

आंध्र प्रदेशातील गुंटूर भागातील रुग्णालयात अशीच एक घटना समोर आली आहे. रुग्णाला आवडणारा बिग बॉस शो पाहायला दिला हा शो रुग्ण पाहात असताना डॉक्टरांनी त्याच्या मेंदूचं ऑपरेशन केलं आहे. या रुग्णाला बिग बॉसचा शो झाल्यानंतर हॉलिवूड चित्रपट दाखवण्यात आला होता.

एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला असून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. मेंदूची सर्जरी करणं जोखमीचं काम असतानाही रुग्णाला जागं ठेवून ते यशस्वीरित्या करणं आव्हान आहे. हे आव्हान डॉक्टरांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं त्यांचं कौतुक देखील होत आहे. 33 वर्षीय रुग्ण वारा प्रसाद असं शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णाचं नाव आहे. मेंदूमध्ये झालेला आजार बरा करण्यासाठी बृंदा न्यूरो सेंटर रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करावी लागणार होती.

हे वाचा-केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या शस्त्रक्रियेदरम्यान वारा प्रसाद बेशुद्ध होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यांच्या मेंदूतील हालचालींवर डॉक्टरांना लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या मेंदूला अॅक्टीव्ह ठेवायला हवी होती. त्यासाठी डॉक्टरांनी या रुग्णाला त्याच्या आवडता बिग बॉस शो आणि हॉलिवूडमधील चित्रपट पाहायला दिला. या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याला शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First published:

Tags: आंध्र प्रदेश