S M L

आंघोळ करताना गिझरचा शॉक लागून तरूण डॉक्टरचा मृत्यू

नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणारे 24 वर्षांचे डॉक्टर आशिष काकडे, यांचा आंघोळ करताना गिझरचा शॉक लागून मृत्यू झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 16, 2018 05:50 PM IST

आंघोळ करताना गिझरचा शॉक लागून तरूण डॉक्टरचा मृत्यू

प्रशांत बाग, नाशिक, 16 जानेवारी : तुम्ही आंघोळीच्या गरम पाण्यासाठी गिझरचा वापर करता. मग तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नाशकात गिझरचा शॉक लागून तरूण डॉक्टरचा मृत्यू झालाय. तुमच्यावर हे जीवघेणं संकट ओढवू नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे.

थंडीचे दिवस सुरू आहेत. अनेकांची सकाळ नक्कीच गरम पाण्याच्या शॉवरनं सुरू होत असणार. मात्र बाथरूममध्ये गरम पाण्यानं आंघोळ करताना दाखवलेला थोडासा हलगर्जीपणा, कुणाच्याही जीवावर बेतू शकतो

नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणारे 24 वर्षांचे डॉक्टर आशिष काकडे, यांचा आंघोळ करताना गिझरचा शॉक लागून मृत्यू झालाय. सोमवारी सकाळी आशिष आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. गरम पाण्यासाठी त्यांनी गिझर सुरू केला. मात्र बरेच तास उलटूनही आशिष बाहेर आले नाही. त्यामुळे सोसायटीतल्या लोकांना संशय आला.

डॉ. आशिष काकडे  ही घटना मनाला चटका लावणारी आहे, तेवढीच आपल्या सगळ्यांना सावध करणारी देखील आहे.गिझर वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यास कुणालाही लाखमोलाचा जीव गमवावा लागू शकतो.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक इलेक्ट्रिकल उपकरणांचा वापर करत असतो. आयुष्य अधिक आरामदायी आणि सुखकर करणारी ही उपकरणं वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यास, लाखमोलाचा प्राण गमवण्याची वेळ येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 05:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close