Home /News /national /

लॉकडाऊनमुळे झालं लग्न! मुलीला भेटायला गेला आणि तिच्याच घरी अडकला, 30 दिवसानंतर...

लॉकडाऊनमुळे झालं लग्न! मुलीला भेटायला गेला आणि तिच्याच घरी अडकला, 30 दिवसानंतर...

लॉकडाऊनमुळे लग्न पुढं ढकलावी लागल्याचं ऐकलं होतं पण एका डॉक्टर तरुणाला लॉकडाऊनमुळे लग्न करावं लागलं आहे.

    बिकानेर, 23 एप्रिल : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे जवळपास सर्व देश ठप्प झाला आहे. नियोजित कार्यक्रमही रद्द करावे लागले आहेत. यातच यंदा ठरलेली लग्नंही पुढे ढकलली आहेत. दरम्यान, एका व्यक्तीचं लॉकाडाऊनमुळे लग्नची तारीख ठरलेली नसताना ते करावं लागलं. अनोख्या अशा लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत. अहमदाबादमधील डॉक्टर विवेक मेहता यांचा साखरपुडा बिकानेर जिल्ह्यातील गंगाशहर इथल्या पूजाशी झाला होता. विवेकचं कुटुंबिया अहमदाबादमध्ये राहतं. साखरपुड्यानंतर अहमदबादमधून तो पूजाला भेटण्यासाठी बिकानेरला 21 मार्चला पोहोचला. त्यानंतर पुढच्याच दिवशी जनता कर्फ्यु लागला आणि 24 ला लॉकडाऊन झालं.14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यावर तो घरी परतणार होता पण पुन्हा 3 मेपर्यंत वाढवल्यावर अडकून पडला. आता हे लॉकडाऊन कधी संपेल हे नक्की सांगता येणार नाही. दरम्यान, होणारा जावई सासरी अडकून पडला आणि मुलीच्या घरच्यांची चिंता वाढली. लग्न न होताच मुलाला किती दिवस असं घरी ठेवून घेणार असा प्रश्न त्यांना सतावत होता. या काळात कोर्ट मॅरेजही शक्य नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला मुलाच्या घरचे अहमदाबादमध्ये असल्यानं लग्न लावणं कठीण होतं. हे वाचा : अक्षय तृतीयेदिवशी घरबसल्या खरेदी करा सोनं, हे ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर शेवटी यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून पूजाच्या वडिलांनी विवेकच्या घरच्या लोकांसोबत चर्चा केली. त्यांच्याशिवाय हे लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर 30 दिवसांनी विवेक आणि पूजा यांचे घरगुती समारंभात लग्न लावून देण्यात आलं. यावेळी फक्त पूजाच्या घरचे लोक उपस्थित होते. विवेकचे आई-वडील, बहिण भाऊ किंवा इतर नातेवाईकांनी लग्नासाठी ऑनलाइन उपस्थिती लावली. हे वाचा : लॉकडाऊनमुळे असा बदलला भारत, NASA ने शेअर केले सॅटेलाइट PHOTO संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या