झिंक आणि गरम पाण्याने कोरोना रुग्णांना बरं केलं; भारतीय डॉक्टरचा दावा

झिंक आणि गरम पाण्याने कोरोना रुग्णांना बरं केलं; भारतीय डॉक्टरचा दावा

लोकांनी आहारात झिंकचा (zinc) समावेश केला तर कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करता येऊ शकतो, असं या डॉक्टरचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : जगभरात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे. शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून कोरोनाविराधातील लस (vaccine) तयार करण्यात जुटलेत. अशात मंगळुरूच्या (Mangalore) एका डॉक्टरनं झिंक आणि गरम पाण्यानं कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो, असं म्हटलं आहे. झिंक (zinc) आणि गरम पाण्याने (hot water) आपण आतापर्यंत 7 कोरोना रुग्णांवर उपचार केले आणि ते बरे झालेत, असा दावाही या डॉक्टरनं केला आहे.

दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार मंगळुरूच्या ए. जे. मेडिकल कॉलेजमधील हेड अँड नेक सर्जरीचे प्राध्यापक डॉ. पी. पी. देवन यांच्या मते, देशातील सर्व लोकांनी जर आपल्या आहारात झिंकचा समावेश केला तर कोरोना किंवा त्यासारख्या कोणत्याही इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो.

हे वाचा - घरी परतताना सोबत नेऊ नका कोरोना! ट्रेन प्रवासात व्हायरसपासून असा बचाव करा

डॉ. पीपी देवन म्हणाले, "शरीरात झिंक योग्य प्रमाणात असेल तर व्हायरस शरीरावर काहीच परिणाम करू शकत नाही. शरीरातील इम्युनिटी मजबूत होईल आणि व्हायरसचा नाश होईल. प्रति दिन 40 एमजी झिंकची गरज असते. दक्षिण भारतात लोकं रसम पितात, यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असतं"

"शरीरात झिंकची मात्रा वाढवण्यासाठी टरबूज, पपईच्या बिया, अननस, अक्रोड यांचं सेवन करावं. पपई आणि टरबूजाच्या बियांची पावडर बनवून भातासोबत खाल्ल्यानंही फायदा होतो. दोन अक्रोड, डार्क चॉकलेट आणि अननलाचं सेवनही शरीरात झिंकची मात्रा वाढवतो. दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर फळांचं सेवन केल्यानंही शरीरात याची मात्रा वाढते. किंवा शरीरात झिंकची मात्रा वाढवणारं औषध घेतल्यानं कोरोनापासून वाचता येऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक आणि आयर्न टॅबलेट्सही घेऊ शकता", असा सल्ला डॉ. देवन यांनी दिला आहे.

हे वाचा - काय कराल आणि काय नाही; लॉकडाऊनमध्ये अशी घ्या शारीरिक आरोग्याची काळजी

डॉ. देवन यांच्या मते, "तुमच्या घशात खवखव होत असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तात्काळ गरम पाणी पिणं सुरू करा. तुम्हाला घाम येईल आणि शरीराचं तापमान एक-दोन डिग्री पर्यंत वाढेल इतकं गरम पाणी प्या. धावल्यानं आणि अंगमेहनतीची कामं केल्यानंही घाम येतो, मात्र गरम पाणी व्हायरसच्या वाढीला रोखेल"

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 13, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या