पैसे नाही म्हणून दाखवलं आयुष्मान कार्ड, डॉक्टर म्हणाले जा मोदींकडून आण पैसे!

पैसे नाही म्हणून दाखवलं आयुष्मान कार्ड, डॉक्टर म्हणाले जा मोदींकडून आण पैसे!

प्रंतप्रधान जन आरोग्य (आयुष्मान भारत )योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक कशा पद्धतीने त्रस्त आहेत याचं जिवंत उदाहरण लखनौच्या किंग्स जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटीमधून समोर आलं आहे.

  • Share this:

लखनौ, 24 ऑक्टोबर : प्रंतप्रधान जन आरोग्य (आयुष्मान भारत )योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक कशा पद्धतीने त्रस्त आहेत याचं जिवंत उदाहरण लखनौच्या किंग्स जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटीमधून समोर आलं आहे. शाहजहांपुरमध्ये उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका रुग्णाला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आयुष्मान भारत योजने अंतर्गत उपचार देण्यासाठी कथितरित्या नकार दिला आहे.

आयुष्मान भारत कार्ड असूनसुद्धा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी नकार दिला असल्याचा आरोप या रुग्णाने केला आहे. बरं इतकंच नाही तर उपचार करण्यासाठी मोदींकडून पैसे घेऊन ये अशी धमकीही दिली असल्याचं रुग्णाने सांगितलं आहे. तर असं खरंच आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी केलं असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं केजीएमयूचे मीडिया इंचार्ज संतोष कुमार यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहांपूरच्या कमलेश पोल हे काम करत असताना त्यांना विजेच्या खांबाचा झटका बसला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात भर्ती केलं. पण त्यांच्यावर योग्य वेळी उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयाने नकार दिला.

 

केजीएमयूमध्ये आयुष्मान भारतचं कार्ड दाखवलं आणि मोफत उपचार करण्यास सांगितलं त्यावर डॉक्टरांनी त्यांना दम ठोकला आणि मोफत उपचार हवे असतील तर जा मोदींकडून पैसे घेऊन ये असं धमकावलं. रुग्णालयाकडून कमलेश यांना अगदी वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली.

मंडळी सरकारकडून सर्वसामान्यासाठी अनेक य़ोजना देण्यात आल्या आहेत. पण त्याचा स्वीकार जर एखादी संस्था करत नसेल तर त्यावर गप्प बसू नका. कारण यात बळी आपलाच जाणार आहे.

 

गाडी दरीत कोसळतानाचा भीषण LIVE व्हिडिओ, मनाली लेह हायवेवर अपघात

First published: October 24, 2018, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading