लोकसभेच्या अध्यक्षांना किती आहे पगार आणि भत्ते? जाणून घ्या!

लोकसभेच्या अध्यक्षांना किती आहे पगार आणि भत्ते? जाणून घ्या!

कार्यकाळ संपल्यानंतर खासदाराला जेव्हढं पेन्शन मिळतं तेवढं पेन्शन त्यांना दिलं जातं. त्याचबरोबर दिल्लीत राहण्यासाठी बंगला, वीज, गाडी निशुल्क दिली जाते.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून :  राजस्थानमधल्या कोट्याचे भाजप खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. लोकसभेच्या अध्यक्षाला घटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. लोकसभेचं कामकाच सुरळीतपणे पार पाडणं आणि विरोधी पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देणं हे काम अध्यक्षांना करावं लागतं. मानचं असलेल्या या पदावर आल्यानंतर  अध्यक्ष हा कुठल्या एखाद्या पक्षाचा न राहता तो सर्व सभागृहाचा असतो.

संसदेच्या 1954 च्या नियमानुसार लोकसभेच्या अध्यक्षांचा पगार, भत्ते आणि पेन्शन निश्चित केलं आहे. 2010मध्ये यात वाढ करण्यात आली. यानुसार लोकसभेच्या अध्यक्षांना महिन्या 50 हजार एवढा पगार मिळतो. त्याचबरोबर अनेक भत्ते आणि सुविधा दिल्या जातात. त्याचबरोबर त्यांना महिन्याला 45 हजार रुपये हा मतदारसंघ भत्ता दिला जातो.  संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच्या काळात आणि इतर सिमित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी त्यांना 2 हजार रुपये दैनिक भत्ता दिला जातो.

कार्यकाळ संपल्यानंतर खासदाराला जेव्हढं पेन्शन मिळतं तेवढं पेन्शन त्यांना दिलं जातं. त्याचबरोबर दिल्लीत राहण्यासाठी बंगला, वीज, गाडी निशुल्क दिली जाते. देश-विदेशात प्रवासासाठीही त्यांना खास सवलती देण्यात आल्या आहेत.

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावंदेखील लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होती. पण, या सर्वांची नावे मागे पडली आणि ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आला. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

First published: June 20, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading