'लष्करा'विषयी पसरविल्या जात आहेत FAKE NEWS, अशा ओळखा खोट्या बातम्या

'लष्करा'विषयी पसरविल्या जात आहेत FAKE NEWS, अशा ओळखा खोट्या बातम्या

खोटी बातमी तयार करणं हा जसा गुन्हा आहे तसच अशी माहिती पुढे पाठवणं हाही गुन्हा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 मार्च : भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारताच्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या म्हणजेच FAKE NEWSचं पीक आलं आहे. पाकिस्तान आणि काही संमाजकंटक भारतीय लष्कराविषयी अतिशय खोटी आणि कलह निर्माण करणारी माहिती पसरवीत आहे त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन लष्कराने केले आहे.

MIG- 21 आणि F-16

भारताच्या बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला होता. त्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं. त्यावरून आता सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत आहेत. त्यावर हवाई दलाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन हवाई दलाने केलं आहे.

हवाई दलाचा बालाकोटचा हल्ला आणि त्यानंतरची पाकिस्तानने काढलेली कुरापत यावरून सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. त्यावर हवाई दलाने 28 फेब्रुवारीला स्पष्टिकरण दिलं होतं. 26 ताखेला भारताने हवाई हल्ला केला. 28 तारखेला सकाळी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला. या विमानांना पिटाळून लावण्याची कामगिरी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 च्या मदतीने पार पाडली. हा पाठलाग करताना F-16 हे लढाऊ विमान मिग-21 ने पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाडलं होतं.

अभिनंदनचं फेक अकाउंट

नंतर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडला आणि त्याची दोन दिवसांमध्ये सुटकाही झाली. त्यानंतर अभिनंदनच्या नावावर त्याचे सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्स तयार झाले आहेत. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं स्पष्टिकरणही हवाईदलाने आज दिलं.

हवाई दालाने प्रसिद्धीपत्रक आणि पत्रकार परिषदेत जी माहिती दिली तीच माहिती अधिकृत असून इतर कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका, व्हिडीओ फॉरवर्ड करू नका असं आवाहनही हवाईदलाने केलं आहे.

अशा ओळखा खोट्या बातम्या?

फेसबुक, वॉट्सअप आणि ट्विटर वर आलेल्या माहितीचा सर्वात पहिले स्रोत तपासा.

ज्यांनी माहिती पाठविली आहेत त्यांचं अकाउंट अधिकृत आहे का याची खात्री करा.

जे अकाउंट्स अधिकृत आहेत. तिथे निळी खून (Right mark) दिसते. तेच अकाउंट व्हेरीफाईड असतं. त्या अकाउंटवरून आलेल्या बातम्यांवरच विश्वास ठेवा.

व्देष पसरविणारं, सामाजिक शांतता बिघडवीणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती पुढे पाठवू नका.

कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवण्याआधी त्या बातमीची खातरजमा करा.

अशी माहिती, व्हिडीओ, फोटो आढळल्यास संबंधीतांना त्यांची माहिती द्या.

खोटी बातमी तयार करणं हा जसा गुन्हा आहे तसच अशी माहिती पुढे पाठवणं हाही गुन्हा आहे.

First published: March 6, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading