इंदौर, 3 फेब्रुवारी : भारतीय जनता पार्टी (BJP) चे राष्ट्रीय महासचिव आणि मध्य प्रदेशचे नेता कैलास विजयवर्गीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेत आले आहेत. लोकांना ड्रग्सऐवजी देशभक्तीच्या नशेचा धडा शिकवता शिकवता ते म्हणाले नशेमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. मात्र देशभक्तीचा नशा इतकाही करू नये की मोदींसारखं लग्नचं केलं नाही.
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये नशेविरोधात मॅरेथ़ॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान भाजप नेता विजयवर्गीय भाषण देत होते. भाषणादरम्यान त्यांनी तरुणांना नशा न करण्याचा सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले की, नशेमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. मात्र ही नशा काम आणि देशभक्तीची असावी. यापुढे जाऊन ते म्हणाले की इतकीही नशा करू नका की मोदींसारख लग्नच करणार नाही.
कैलाश विजयवर्गीय अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी इंदौरचे प्रसिद्ध पोह्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्य़ांच्या या वक्तव्यानंतर मात्र विरोधकांनी त्यांना निशाण्यावर धरले होते. पोह्यांबाबत ते म्हणाले होते की माझ्या घर मजुरी करणाऱ्या लोकांच्या पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन माझ्या लक्षात आले की ते बांगलादेशी आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाज माध्यमांतून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यापूर्वी संघ पदाधिकाऱ्यांसंबंधात त्यांनी विवादास्पद विधान वक्त केलं होत.
अन्य बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.