चेन्नई, 9 ऑगस्ट : द्रविड़ मुनेत्र कषगम (Dravida Munnetra Kazhagam) च्या खासदार कनिमोई (Kanimozhi) यांनी रविवारी ट्विट करुन एक प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे देशात पुन्हा एका वादावर चर्चा सुरू झाली आहे. रविवारी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (Central Industrial Security Forces) एका अधिकाऱ्याला तमिळ (Tamil) वा इंग्रजीतून (English) बोलण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी आपण भारतीय आहात? असा प्रश्न उपस्थित केला.
कनिमोई यांनी ट्वीट केलं आहे की, ‘‘आज एअरपोर्टवर जेव्हा मी सीआईएसएफ (CISF) च्या एका अधिकाऱ्याला सांगितलं की त्याने तमिळ वा इंग्रजीतून बोलावं, कारण मला हिंदी येत नाही तेव्हा त्यांनी मी भारतीय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ’’
Today at the airport a CISF officer asked me if “I am an Indian” when I asked her to speak to me in tamil or English as I did not know Hindi. I would like to know from when being indian is equal to knowing Hindi.#hindiimposition
महिला खासदारांनी पुढे लिहिलं आहे की, मला जाणून घ्यायचं आहे की भारतीय आणि हिंदी हे समान आहे का? म्हणजे भारतीय होण्यासाठी हिंदी येणं गरजेचं आहे? #हिंदीथोपना.’’ द्रमुकच्या महिला शाखेची सचिव (Women's wing secretary, Dravida Munnetra Kazhagam) यांच्या या ट्विटचं सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी समर्थन केलं आबे. एकाने प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, ‘‘ मी भारतीय आहे आणि हिंदीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.