वेल्लोर लोकसभा निवडणूक: सत्ताधारी NDAला धक्का, DMKचा मोठा विजय

वेल्लोर लोकसभा निवडणूक: सत्ताधारी NDAला धक्का, DMKचा मोठा विजय

तामिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून DMKचे उमेदवार डी.एम.कथिर आनंद यांचा विजय झाला आहे.

  • Share this:

चेन्नई, 09 ऑगस्ट: तामिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून DMKचे उमेदवार डी.एम.कथिर आनंद यांचा विजय झाला आहे. आनंद यांनी सत्ताधारी अण्णा DMKआणि NDAचे उमेदवार ए.सी.शनमुगन यांचा पराभव केला. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वेल्लोरमधील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांवर निवडणुका झाल्या होत्या. वेल्लोरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने येथील निवडणुक पुढे ढकलली होती.

वेल्लोर मतदारसंघात 5 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. येथील 1 हजार 400 मतदान केंद्रावर 63 टक्के मतदानाची नोंद झाली होती. निवडणुकीच्या रिंगणात 28 उमेदवार होते. यातील खरी टक्कर सत्ताधारी अण्णा DMKचे शनमुगन आणि DMKचे आनंद यांच्यात होती. केंद्रात मोदी सरकारच्या सोबत असलेल्या अण्णा DMKकडून या निवडणुकीत मुख्यमंत्री ई.के.पलनीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी जोरदार प्रचार केला होता. तर DMKकडून पक्षाचे अध्यक्ष एम.के.स्टलिन मैदानात उतरले होते. आनंद यांनी शनमुगन यांचा 8 हजार 141 मतांनी पराभव केला.

भाजपविरोधी प्रचार

वेल्लोर मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. DMKने प्रचारात भाजपविरोध हाच मुख्य मुद्दा केला होता. भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे पक्षाचा विजय झाल्याचा दावा DMKने केला आहे.

का रद्द झाली होती निवडणूक

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचारा दरम्यान वेल्लोरमधील DMKच्या उमेदवाराच्या प्रचार केंद्रातून 11.5 कोटी इतकी मोठी रक्कम सापडली होती. त्यानंतर आयोगाने येथील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नियोजित कार्यक्रमानुसार वेल्लोरमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. पण आयोगाने यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहले होते आणि त्यांच्या मंजूरीनंतर येथील निवडणूक रद्द केली होती. मतदारांना आकर्षिक करण्यासाठी पैशांचा वापर केल्यामुळे एखाद्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची ही पहिली वेळ होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या