IAS इनायत खान यांची अनोखी मानवंदना! शहीद जवानांच्या मुलींचा करणार सगळा खर्च

IAS इनायत खान यांची अनोखी मानवंदना! शहीद जवानांच्या मुलींचा करणार सगळा खर्च

जिल्हाधिकारी इनायत खान यांनी बिहारमधील शहीद जवानांच्या मुलींना घेतलं दत्तक

  • Share this:

पटना, 18 फेब्रुवारी : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभर संताप व्यक्त होत आहे. सर्व स्तरातून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली जात आहे. बिहारमधील शेखपुराच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनीही शहीद जवानांच्या मुलींना दत्तक घेतलं आहे. बिहारमधील सीआरपीएफ जवान संजय कुमार सिन्हा आणि रतनकुमार ठाकुर या शहीद जवानांच्या मुलींना दत्तक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

जिल्हाधिकारी इनायत खान यांनी मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय दोन दिवसांचे वेतन शहिदांच्या कुटुंबीयांना देणार आहे. तसंच आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत करावी अशी विनंती केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देश दु:खात आहे, या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे इनायत खान यांनी म्हटलं आहे. आपल्याकडून अशा प्रकारची मदत हीच जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही इनायत खान म्हणाल्या.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आधाराचा हात देण्याासाठी अनेकजण पुढे येत आहेत. मध्य प्रदेश सरकारने 1 कोटी तर महाराष्ट्र सरकारने 50 लाख रुपये शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्यांना शिक्षण देणं हे माझं भाग्य असेल असंही सेहवागने म्हटलं होतं.

First Published: Feb 18, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading