नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : पत्नी आणि वडिलांचे अवैध संबंध असल्याच्या संशयातून हत्येचा थरार राजधानी दिल्लीमध्ये आला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोटच्या मुलानं वडिलांची तराजू आणि दुपट्ट्यानं गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. वडील आणि सुनेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दिवाळीच्या दिवशी सणासुदीला द्वारका जिल्ह्यातील उत्तम नगर ओम विहार परिसरात 60 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोटच्या मुलानेच ही हत्या केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडील आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत दोघांमध्ये खूप वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाताच त्याचं हत्येत रुपांतर झालं.
मिळालेल्या माहितीनुसार मृत वडिलांचे नाव दिलर असून त्यांना दोन मुलं आहे. मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे. दोन मुलं सून आणि वडील असे एकत्र राहात होते. त्यांचा मोठा मुलगा मजूर म्हणून काम करत होता. अनेक दिवसांपासून वडील आणि पत्नीचे अवैध संबंध असल्याची शंका मोठा मुलगा अवधेशला होती. त्यावरून वडील आणि मुलामध्ये खूप भांडण देखील झालं. दिवाळीच्या आधी त्यानं आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिलं आणि वडिलांची तराजू आणि दुपट्ट्याच्या मदतीनं निर्घृण हत्या केली.
हे वाचा-
Android युजर्स अलर्ट; तुमच्या फोनमध्ये Apps सोबत व्हायरस तर डाउनलोड होत नाही ना?
अवधेशनं रागाच्या भराच्या तराजूच्या हातोड्यानं वडिलांना बेदम मारहाण केली. वडील यातनेनं व्हिव्हळत होते रक्तबंबाळ झाले होते मात्र अवधेशच्या डोक्यात रागाची तिडीक गेली आणि त्यानं दुपट्यानं गळा आवळून हत्या केली. लहान भाऊ जेव्हा घरी आला तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीनं पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या भावाला ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.