राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके

हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शनिवारी रात्री 414 वरून 481वर पोहोचला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट असलं तरी देशभरात लोक दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत. केवळ कोरोनाच नाही तर राजधानी दिल्लीमध्ये वाढणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवपर फटक्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सरकारच्या नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत दिल्लीतील काही परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आहेत. एकीकडे वाढणारं प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारा कोरोनाचा धोका या सर्वात आता शनिवारी नागरिकांनी फटाके फोडल्यामुळे हवेत अधिकच प्रदूषण झालं आहे.

राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खूप जास्त बिघडल्याचं दिसत आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या (डीपीसीसी) आकडेवारीनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शनिवारी रात्री 414 वरून 481वर पोहोचला होता. असे आयटीओ क्षेत्रातील प्रसिद्ध झालेल्या चार्जवरून दिसून येत आहे. हे प्रमाण वाढत राहिलं तर दिल्लीकरांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. प्रदूषण आणि कोरोनाचे वाढणारे रुग्ण यामुळे चिंतेचं वातावण आहे.

हे वाचा-पुणे-सोलापूर हायवेवर अपघातानंतर कुटुंबासोबत घडली लाजीरवाणी गोष्ट

हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी दिल्ली आणि आसपासचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले. बर्‍याच भागात फटाकांवर बंदी असूनही लोक फटाके फोडत होते. दिल्लीतील प्रदूषणामध्ये 32 टक्के हिस्सा हा पेंढा जाळण्याचा आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हवेची गुणवत्ता खालवत चालल्यानं प्रदूषणाची स्थिती अधिक बिकट होत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे धुरकट दिसायला लागलं आहे.

दुसरीकडे दिल्लीमध्ये कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत आहे. याचं कारण म्हणजे या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या दिल्लीत वाढली. रिकव्हरी रेट चांगला असला तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचं आणि नवीन रुग्णांची संख्या वाढण्याचं प्रमाण देखील दिल्लीमध्ये सर्वाधिक असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 7:53 AM IST

ताज्या बातम्या