#BREAKING : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून केला हल्ला, प्रकृती नाजूक

#BREAKING : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून केला हल्ला, प्रकृती नाजूक

आज सकाळी दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्या घरावर हल्ला केला. अब्दुल हमीद यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच भागात उपस्थित असलेल्या भाजपच्या आणखी एका महिला कार्यकर्त्याच्या घरात घुसले.

  • Share this:

श्रीनगर, 09 ऑगस्ट : श्रीनगर. जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा (Ompora) भागात दहशतवाद्यांनी (Terrorist) आज सकाळी भाजप (BJP) कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला. सध्या अब्दुल हमीद (Abdul Hamid Najar) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर तेथून पळ काढला. सध्या ओमपोरा परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्या घरावर हल्ला केला. अब्दुल हमीद यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच भागात उपस्थित असलेल्या भाजपच्या आणखी एका महिला कार्यकर्त्याच्या घरात घुसले. मात्र, भाजपच्या महिला कार्यकर्त्या त्यावेळी घरी उपस्थित नव्हत्या, त्यानंतर दहशतवादी तेथून पळ काढला.

अब्दुल हमीद हे बडगाम जिल्ह्यातील भाजपच्या ओबीसी युनिटचे जिल्हाध्यक्ष होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल केले. अब्दुल हमीद यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी या भागात घेराव घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागात दहशतवाद्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि सरपंच सज्जाद खांडे यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

भाजप नेत्यांनी प्रशासनाकडून मागितली सुरक्षा

गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून सुरक्षेची मागणी केली आहे. काश्मीरमधील नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्याची घटना गेल्या अनेक वर्षांपासून समोर येत आहे, परंतु यावर्षी जूनमध्ये अनंतनाग जिल्ह्यात कॉंग्रेस नेते अजय पंडिताच्या हत्येमुळे हा मुद्दा तीव्र झाला. अजय पंडिता हे लार्कीपुराचे सरपंचही होते.

2017 पासून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

2017 पासून भाजप नेत्यांवर हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत. 4 मे 2019 रोजी अनंतनाग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष गुल मुहम्मद मीर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यापूर्वी 22 ऑगस्ट 2018 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते शबीर अहमद भट्ट यांना ठार केले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 30 वर्षांच्या गौहर हुसेन भट यांची हत्या केली होती.

Published by: Priyanka Gawde
First published: August 9, 2020, 8:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading