Home /News /national /

पाकिस्तान लष्करप्रमुखांना आली भारताची आठवण, काश्मीर प्रश्नाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

पाकिस्तान लष्करप्रमुखांना आली भारताची आठवण, काश्मीर प्रश्नाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

काश्मीर वादासह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर पाकिस्तानचा विश्वास आहे आणि आम्ही भारतासोबत या मुद्द्यावर पुढे जाण्यास तयार आहोत, असं पाकिस्तान लष्करप्रमुखांनी म्हटलं.

    मुंबई, 2 एप्रिल : पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार सध्या राजकीय संकटात आहे. इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला आहे आणि पंतप्रधानांची सत्तेवरील पकड सैल होताना दिसत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठे भाष्य केले आहे. भारतासोबतचे वाद शांततापूर्ण चर्चेने सोडवले जावेत, अशी भूमिका बाजवा यांनी शनिवारी घेतली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांनी दोन दिवसीय 'इस्लामाबाद सुरक्षा संवाद' परिषदेच्या शेवटच्या दिवशी सांगितले की, इस्लामाबाद काश्मीरसह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या भागात संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आखाती प्रदेश आणि इतरत्र जगाचा एक तृतीयांश भाग कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील संघर्ष आणि युद्धात गुंतलेला असल्याने आमच्या प्रदेशातून संघर्ष बाहेर ठेवणे महत्त्वाचे आहे. काश्मीर वादासह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर पाकिस्तानचा विश्वास आहे आणि आम्ही भारतासोबत या मुद्द्यावर पुढे जाण्यास तयार आहोत, असं पाकिस्तान लष्करप्रमुखांनी म्हटलं. भारताकडून संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत; उपाशी झोपणाऱ्या नागरिकांना मिळेल दिलासा आमच्या सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी आमचे नागरीक आहेत. नागरिकांची सुरक्षा, सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समृद्धी ठेवणे हे पाकिस्तानचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण असल्याचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी असंख्य बलिदान दिले आहेत. मात्र, दहशतवाद आणि हिंसक अतिरेकींचा धोका अजूनही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानी पंतप्रधानांचा रडीचा डाव.. म्हणे, अमेरिकेनं धमकी दिली, Imran Khan यांना हटवावं, नाहीतर.. बाजवा यांचं वक्तव्य अशा वेळी आली आहे जेव्हा इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले होते की त्यांना पाकिस्तानसाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरण हवे आहे. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असेल, असे मी ठरवले आहे. स्वतंत्र परराष्ट्र धोरण हेच पाकिस्तानचे आहे. याचा अर्थ असा नाही की आपण कोणाचे शत्रू होऊ. ते म्हणाले की, आमच्या या परराष्ट्र धोरणाचा अर्थ अमेरिकाविरोधी, भारतविरोधी किंवा युरोपविरोधी असा नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: India, Jammu kashmir, Pakistan

    पुढील बातम्या