लखीमपूर, 22 जून : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे सोमवारी पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीने सकाळी कडक चहा न बनविल्यामुळे पतीने रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पती चाकू घेऊन फरार झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना पसागवाण कोतवालीच्या मोहल्ला गांधी नगरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार बद्री प्रसाद उर्फ बबलूची पत्नी रेणू देवी (वय 35) आज सकाळी स्वयंपाकघरात चहा बनवत होती. यावेळी पत्नीने कडक चहा बनवला नव्हता. यामुळे संतापलेल्या बबलूने त्यांच्या पत्नीवर चाकूंनी हल्ला केला. त्याने पत्नीच्या गळ्यावर वार केले.
मृतांचे काका राम सिंग यांनी सांगितले की, रेणू आणि बबलूचे 16 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांनाही तीन मुले आहे. रेणू 6 महिन्यांची गरोदर होती. बबलू खूप चिडचिडा आहे. छोट्या छोट्या छोट्या गोष्टींवरुन तो नेहमीच पत्नी रेणूबरोबर भांडण करीत असे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक खेरी पूनम यांनी सांगितले की चहाच्या वादात बबलूने पत्नीची हत्या केली. शक्य तितक्या लवकर आरोपी युवकास अटक करुन तुरूंगात पाठविण्यात येईल. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
हे वाचा-
कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तीशाली तुकडी चीनला शिकवणार धडा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.