अमृतसर, 02 जुलै : एक किरकोळ कारणातून वाद विकोपाला गेला आणि भररस्त्यात वाद झाला आणि प्रकरण एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत गेलं. गल्लीत लाईट लावण्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. वाद वाढल्यानं एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादात एक तरुणावर कात्रीने सपासप वार करण्यात आले. यामध्ये तरुण गंभीर जखणी झाला आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही धक्कादायक घटना इस्लामाबादमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. रागाच्या भरात कात्रीनं तरुणावर वार सपासप वार केले जात आहेत.
तरुणाला वाचवण्यासाठी आलेली एक महिलाही या मारहाणीमध्ये जखमी झाली. या महिलेलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गल्लीमध्ये लाइटवरून झालेल्या वादातून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्यानं हा प्रकार घडला आहे. जखमींवर अमृतसरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.