Elec-widget

काळजी करू नका, पैसे कुठेच गेले नाहीत, नोटबंदीच्या काळात माओवाद्यांमध्ये मतभेद

काळजी करू नका, पैसे कुठेच गेले नाहीत, नोटबंदीच्या काळात माओवाद्यांमध्ये मतभेद

नोटबंदीच्याकाळात माओवादी नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचं समोर आलंय. पाच माओवादी समर्थकांच्या अटकेवर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर केलेत त्यात ही बाब उघड झालीय.

  • Share this:

मुंबई, ता. 31 ऑगस्ट : नोटबंदीच्याकाळात माओवादी नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचं समोर आलंय. पाच माओवादी समर्थकांच्या अटकेवर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर केलेत त्यात ही बाब उघड झालीय. कवी आणि विचारवंत वरवर राव यांनी नागपूरातले वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेल्या पत्रात या मतभेदांचा उल्लेख आढळतो. गडचिरोत देण्यासाठी पैसे पाठवले होते मात्र ते अजुन का पोहोचले नाहीत अशी विचारणा राव यांनी गडलिंग यांच्याकडे केली होती. पैसे नसल्यानं चळवळ थंडावल्याचंही राव यांनी पत्रात लिहिलं होतं.

गडलिंग यांनी राव यांना पत्र लिहून स्पष्टिकरण दिलं. कुठलीही काळजी करू नका, पैसे कुठेच गेलेले नाहीत. नोटबंदीमुळं पैसे पोहोचविण्यात अडचण येत आहे आणि आता प्रकरण मार्गी लागलं असून पैशाच्या काही खेपा पोहोचविल्या आहेत. असं स्पष्टीकरण गडलिंग यांनी दिलं होतं. त्यामुळं नोटबंदीच्या सुरवातीच्या काळात हे मतभेद झाल्याचं उघड झालं.

काय आहे पत्र

वरवर राव यांनी नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्र

नोटबंदीमुळे जंगलातल्या लोकांना पैशाची अडचण भासत आहे. तुमच्याकडे पैसे पाठवले होते मात्र त्याच वितरण अजून झालं नाही अशी माहिती आहे. नेमकं काय झालं तेही कळत नाही. पैसे नसल्यानं कारवाया थंडावल्या आहेत.

Loading...

वरवर राव यांच्या या पत्राला सुरेंद्र गडलिंग यांनी दिलेलं पत्र

नोटबंदीमुळं तपासणी जोरात सुरू होती. त्यामुळं गडचिरोलीत पैसे पाठवायला उशीर झाला. दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही दिलेले पैसै आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. आणि त्या पैशांचा पुरवढा सुरू केला आहे. आणि काही रक्कम पोहोचलीही आहे.

VIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...