• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'दहन' आणि 'दफन'मध्ये अडकला मृतदेह; आई-पत्नीच्या वादातून मृत्यूनंतरही सुटका नाही

'दहन' आणि 'दफन'मध्ये अडकला मृतदेह; आई-पत्नीच्या वादातून मृत्यूनंतरही सुटका नाही

'मृत्यूने केली सुटका, जगण्याने छळले होते'...मात्र येथे मृत्यूनंतरही सुटका नाहीच..

 • Share this:

  इंदूर, 20 सप्टेंबर : प्रकाशचा सलीम झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावरुन (dispute over dead body) आई व पत्नीमध्ये वाद सुरू झाला आहे. या व्यक्तीच्या आई व बहिणीची इच्छा आहे की, त्यांना दफन न करता त्याचं दहन केलं जावं. तर पत्नीची इच्छा आहे की, त्यांच्यावर मुस्लीम पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावे. अशावेळी रुग्णालयात पोहोचलेले पोलीस देखील गोंधळात आहेत. अद्यापही काही निर्णय होऊ शकलेला नाही. ही घटना मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh News) इंदूरमधील असल्याचं समोर आलं आहे. या मृत व्यक्तीचं नाव प्रकाश उर्फ सलीम पुत्र दरियाव सिंह (40) असं असू ते शांतिनगर येथे राहत होते. संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. रात्री त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला. प्रकाशची पत्नी हारून बी आणि मुलगी रानी बी रुग्णालयात पोहोचले आणि पोस्टमार्टम सुरू केलं. जेव्हा याबाबत त्याची बहीण आणि आईला कळलं तेव्हा त्या मृतदेह घेऊन जाण्यासाठी आल्या. याशिवाय हिंदू पद्धतीनं अत्यंसंस्कार करण्याबद्दल बोलू लागले. हे ही वाचा-VIDEO : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण पहिल्या पत्नीनंतर प्रेमसंबंधात केलं होतं लग्न प्रकाशच्या आईने सांगितलं की, मुलगा ट्रक चालवत होता. त्याची पत्नी 15 वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. यानंतर तो हारून बी हिच्यासोबत राहू लागला. प्रकाशने तिच्यासोबत लग्न केलं नाही. मात्र ते एकत्र राहत होते. त्याशिवाय प्रकाश याची मुलगी रानी बी हिने आरोप केला आहे की, साडे नऊ वाजता वडिलांना फोन आला आणि त्यांची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ती म्हणाली माझ्या वडिलांचं नाव सलीम खान आहे. ते आधी सोरम बाई यांचं पूत्र होते, मात्र माझ्या आईसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी धर्म परिवर्तन केलं होतं.

  Published by:Meenal Gangurde
  First published: