• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कुमुदिनी यांच्या अंत्यसंस्कारावरुन भय्यू महाराजांच्या मुलगी आणि पत्नीमध्ये वाद, मृत्यूच्या चौकशीची वकीलांची मागणी

कुमुदिनी यांच्या अंत्यसंस्कारावरुन भय्यू महाराजांच्या मुलगी आणि पत्नीमध्ये वाद, मृत्यूच्या चौकशीची वकीलांची मागणी

भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांची आई कुमुदिनी देवी (Kumudini Devi) यांचं शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. मात्र, त्यांचे अंत्यसंस्कार कोण करणार यावरुन भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आणि मुलगी यांच्यात चांगलाच वाद झाला .

 • Share this:
  नवी दिल्ली 10 मे: भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांची आई कुमुदिनी देवी (Kumudini Devi) यांचं शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. कुमुदिनी या भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदार होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून इंदौरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजीच्या निधनाची बातमी मिळताच रविवारी कुहू पुण्याहून इंदौरला पोहोचली. ती सरळ मुक्तिधाममध्ये गेली. इथे जात तिनं आजीवर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भय्यूजी महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीनं हे करू दिलं नाही. अनेक तास अंत्यसंस्कार कोण करणार या मुद्द्यावरुन दोघींमध्ये वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदिनी देवी इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये भर्ता होत्या. रविवारी आजीच्या निधनाची बातमी ऐकताच कुहू दुपारी तीन वाजता इंदौरमध्ये दाखल झाल्या. स्मशानभूमीत जाताच तिनं आयुषीला सांगितलं, की आजोबा आणि वडील भय्यूजी महाराज यांचे अंतिम संस्कारही मान्य केले होते, त्यामुळे हिंदू रितीप्रमाणेच कुमुदिनी यांच्यावरही मलाच अंत्यसंस्कार करू द्यायाला हवे. मात्र, कुहू तिथे एकटी पडली. आयुषीच्या सोबत असलेल्या लोकांनी कुहूला अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी (Bhaiyyu Maharaj Death Case) आरोपी शरद आणि विनायकचे वकील धर्मेंद्र गुर्जर आणि आशिष चौरे यांचं म्हणणं आहे, की या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. कारण याप्रकरणी त्यांची आई कुमुदिनी जबाब नोंदवणार होत्या. मात्र, हे अनेक काळापासून प्रलंबित राहिलं. घटनेची माहिती मिळताच फिर्यादींनी आयुषीसह मिळून कुमुदिनी देवींची साक्ष न घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वकील धर्मेंद्र गुर्जर म्हणाले की, आरोपींशी चर्चा केल्यानंतर ते या मृत्यूच्या चौकशीसाठीही अर्ज करू शकतात.
  Published by:Kiran Pharate
  First published: