Home /News /national /

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी बंगालमध्ये हिंसाचार, BJP-TMC कार्यकर्ते आमनेसामने

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी बंगालमध्ये हिंसाचार, BJP-TMC कार्यकर्ते आमनेसामने

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 125 व्या जयंती निमित्ताने वंदन करण्यासाठी आज टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते बैरकपूर येथे एकत्र जमले होते. यावेळी नेताजी यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला.

    कोलकाता, 23 जानेवारी : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीदिनी (Netaji Subhas Chandra Bose 125th birth anniversary) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. बंगालमधील भाटपाडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या भाजप (BJP) आणि टीएमसीच्या (TMC) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा गदारोळ झाला. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप खासदार अर्जुन सिंह (Arjun Singh) यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार (firing) करावा लागला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 125 व्या जयंती निमित्ताने वंदन करण्यासाठी आज टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते बैरकपूर येथे एकत्र जमले होते. यावेळी नेताजी यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. हा वाद इतका उफाळला की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरंतर घटनास्थळी भाजप खासदार अर्जुन सिंह पोहोचल्यानंतर गोंधळ झाला. सिंह घटनास्थळी दाखल होताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. अर्जुन सिंह दाखल होताच त्यांना टार्गेट करण्यासाठी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली, असा आरोप भाजपकडून करण्याच आला आहे. या दरम्यान अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार सुरु करुन त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन गेले. विशेष म्हणजे हा गदारोळ जेव्हा झाला तेव्हा पोलीसही तिथेच होते. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस पुढे आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट लाठीचार्ज सुरु केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तातडीने मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. या घटनेदरम्यान अर्जुन सिंह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, असा दावा भाजपने केला आहे. तर अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी सातवेळा राउंड फायरिंग केली ते अतिशय चुकीचं होतं, अशी भूमिका टीएमसीने मांडली आहे. (नागपुरात पेपर फुटला?, ABVP च्या दाव्यानंतर MPSC चं स्पष्टीकरण) टीएमसीच्या लोकांनी हल्ला केली, भाजप खासदाराची प्रतिक्रिया "रविवावारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आमचे आमदार पवन सिंह नेताजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. तेव्हा टीएमसीच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दिशेला गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच विटा फेकण्यात आल्या. त्यानंतर मी तिथे पोहोचलो तेव्हा माझ्यावरही हल्ला केला. पोलिसांच्या समोर सगळं घडत होतं. माझी गाडी फोडण्यात आली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे", अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या