मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप अन् शिंदे गटात कुरबुरी? एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द, कॅबिनेट विस्तारालाही ग्रहण

भाजप अन् शिंदे गटात कुरबुरी? एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द, कॅबिनेट विस्तारालाही ग्रहण

कधी होणार कॅबिनेटचा विस्तार? सर्व गोष्टींवर टांगती तलवार?

कधी होणार कॅबिनेटचा विस्तार? सर्व गोष्टींवर टांगती तलवार?

कधी होणार कॅबिनेटचा विस्तार? सर्व गोष्टींवर टांगती तलवार?

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 28 जुलै : राज्यात नव्या सत्ता स्थापनेला आता बराच काळ लोटला आहे. मात्र तरीही अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटचा विस्तार केलेला नाही. बुधवारी मुख्यमंत्री यासाठी दिल्लीला जाणार होते. येथे ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार होते. मात्र शेवटी त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्याबाबतच कारण मात्र शिंदेंनी सांगितलं नाही. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे म्हणाले होते की, येत्या तीन दिवसात ते कॅबिनेटचा विस्तार करतील. मात्र दिल्ली दौऱ्यावर जाणे रद्द झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. लोक आता शिंदे गट आणि भाजपमधील समीकरणांवर चर्चा करू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अनेकदा दिल्ली दौरा केला आहे. अधिकांश बैठकीनंतर कॅबिनेट विस्तार केला जाईल, असं सांगितलं जात होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. सोबतच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेलाही अनेक दिवस पलटले आहेत. 30 जूव रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर सांगितलं जात होतं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. मात्र अद्याप त्यांना यासाठी वेळ मिळू शकला नाही. यादरम्यान विरोधी पक्षांकडून मंत्रिमंडाळाचा विस्तार न करण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. मंत्रिपरिषदेचा विस्तार न झाल्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. सोबतच या नागरिकांना मदत मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्याशिवाय राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशनही अद्याप होऊ शकलं नाही.

First published:

Tags: Amit Shah, Delhi, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या