सायकलिंगसाठी गेलेल्या तरुणीसोबत किळसवाणा प्रकार; पत्ता विचारत असताना कारचालकाने दाखविलं गुप्तांग

सायकलिंगसाठी गेलेल्या तरुणीसोबत किळसवाणा प्रकार; पत्ता विचारत असताना कारचालकाने दाखविलं गुप्तांग

या प्रकारानंतर तरुणी खूप घाबरली होती, कारचालक तरी तिचा पाठलाग करीत होता

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : द्वारका या भागात सकाळी सायकलिंग करणाऱ्या एका तरुणीला कारमधून जाणाऱ्या एका तरुणाने गुप्तांग दाखविल्याची घटना समोर आली आहे. त्याने खूप लांबपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. ही घटना द्वारका सेक्टर-11 स्पोर्टस काॅम्पलेक्सपासून दसरा ग्राऊंडला जाणाऱ्या रस्त्यावर झाला. तरुणीने या घटनेनंतर एक व्हिडीओ शेअर केला. द्वारका सेक्टर-99 पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

कार आणि आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  द्वारका डीसीपी संतोष कुमार मीणा यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी एक ट्विट करण्यात आलं होतं. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी लवकरच पकडला जाईल. तरुणीने व्हिडीओमध्ये  तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आणि महिला व तरुणींना संदेशही दिला आहे. तरुणीने सांगितले 17 ऑक्टोबरच्या सकाळी ती आपल्या घरामधून सायकलवरुन बाहेर निघाली होती. काही अंतरानंतर सेक्टर-11 स्पोर्ट्स काॅम्प्लेक्सपासून दसरा ग्राऊंड जाणाऱ्या रोडवर होती. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. तिने पाहिले की एक ग्रे रंगाची छोटी कार ज्याची मागची काच तुटली होती, फुटपाथजवळ उभी होती.

फुटपाथ आणि कारमधील जागेत सायकल चालवत ती पुढे गेली. काही अंतरावर गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की कार आपला पाठलाग करते. तिने सायकलची गती वाढवली. यानंतर आरोपी तरुण हॉर्न वाजवू लागला आणि काही तरी पुटपुटत होता. तरुणीने इशाऱ्याने त्याला पुढे जाण्यास सांगितले. मात्र तो मागे येत होता. कार तिच्या जवळ आली आणि त्यात बसलेल्या एका तरुणाने सेक्टर-14 चा रस्ता विचारू लागला. तो काही म्हणणात तेव्हा तरुणीने पाहिलं की तरुण आपलं गुप्तांग दाखवित आहे.

हे ही वाचा-रक्ताच पाणी करुन ज्याला वाढवलं त्याच लेकराचा आईने कुऱ्हाडीने कापला गळा

ती घाबरली. ती जलद गतीने सायकल चालवू लागली. तरुणदेखील गाडी घेऊन तिचा पाठलाग करू लागला. तरुणीने सेक्टर-11 स्पोर्ट्स काॅम्प्लेक्सच्या गेटवर काही गाड्या उभ्या असलेल्या पाहिल्या. ज्यानंतर तरुणीने जोरजोरात मदतीसाठी ओरडू लागली. तरुणीने सांगितले की, कारवर नंबर प्लेट नव्हती. ही घटना  सकाळी साधारण 8.40 ते 9 यादरम्यान झाली. तरुणीने सांगितले की, जे लोक मुलींच्या कपड्यांवरुन प्रश्न उपस्थित करतात त्यांना सांगू इच्छिते की, या वेळी मी फूल स्लीव्जचा शर्ट, ट्रॅक पँट आणि मास्क घातला होता. यावेळी तरुणीने मुलींना सेल्फ डिफेन्स आवश्यक असल्याचे सांगितले.

Published by: Meenal Gangurde
First published: October 22, 2020, 8:05 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या