घृणास्पद! कुत्रा भुंकला म्हणून माथेफिरु तरुणाने घातली गोळी, तडफडत मुक्या प्राण्याने सोडला जीव

घृणास्पद! कुत्रा भुंकला म्हणून माथेफिरु तरुणाने घातली गोळी, तडफडत मुक्या प्राण्याने सोडला जीव

माथेफिरु तरुणाने कुत्रा भुंकला म्हणून त्याच्यावर गोळी झाडली.

  • Share this:

अमरोहा, 22 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोहा (Amroha) भागात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका माथेफिरु तरुणाने कुत्रा भुंकला म्हणून आपल्या परवानाधारक बंदुकीने गोळी घालून त्याची हत्या केली. गोळी लागल्यामुळे त्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाने सांगितल्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण सैदनगली ठाणे क्षेत्रातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार जीहल गाव निवास कय्यूम याने गावातील राहणाऱ्या राध्येश्यामचा पाळीव कुत्रा भुंकल्याकारणाने त्याला बंदुकीची गोळी घालण्यात आली. यानंतर कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकताना संपूर्ण गावकरी जागे झाले.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीविरोधात केस दाखल केली. या घटनेनंतर आरोपी कय्यूम फरार आहे. पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. मुक्या जनावरांचा अशा प्रकारे जीव घेणे अत्यंत घृणास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्या माथेफिरुकडे स्वत:ची परवानाधारक बंदुक होती. त्याच्या माध्यमातून केवळ कुत्रा भुंकल्याने त्याने गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून फरार आरोपीचीही शोध घेतला जात आहे.

हेही वाचा

अरे देवा! रणबीरची EX होणार त्याची 'आई'? वाचा काय आहे भानगड

‘सोनिया आणि राहुल गांधींची फाईल अमित शाहांच्या टेबलवर’, नागरिकत्त्व होणार रद्द?

काळजी घ्या...उकळत्या पाण्यात पडून ३ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2020 02:37 PM IST

ताज्या बातम्या