Home /News /national /

घृणास्पद! साधूने केली 5 लग्न, बायकांनाच करायला सांगायचा अश्लील काम

घृणास्पद! साधूने केली 5 लग्न, बायकांनाच करायला सांगायचा अश्लील काम

तो सत्संग करतो आणि तंत्रविद्या करीत महिलांना आपल्याकडे आकर्षित करतो

  नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : एका व्यक्तीने साधुच्य़ा नावावर माणुसकीला काळीमा फासणारी कामं केली आहेत. या साधुने 1 किंवा 2 नाही तर तब्बल 5 महिलांशी लग्न केली आहेत. या महिलांना तो नशेचे इंजेक्शन देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेत होता. याबाबत महिलांनी पोलिसांकड़े तक्रार केल्यानंतर ही सर्व बाब समोर आली. पीडित महिलांनी डीआयजी राजेश कुमार पांडेय यांच्याकड़े यासंदर्भात तक्रार केली. यानंतर डीआयजींनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. डीआयजींनी आरोपी साधुविरोधात कारवाईचे आदेश देत त्याला ताब्यात घेतले आहे. डीआयजींकड़े तक्रार करताना महिलांनी साधू अनुज चेतन सरस्वती यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. महिलांचा आरोप आहे की, अनुज चेतन सरस्वती साधूच्या रुपात राक्षस आहे. तो सत्संग करतो आणि तंत्रविद्या करीत महिलांना आपल्याकडे आकर्षित करतो. या साधूने आतापर्यंत 5 लग्न केली आहेत. तो महिलांना नशेचे इंजेक्शन देतो आणि त्यांना देह व्यापार करण्यासाठी जबरदस्ती करतो. जी महिला त्याचं ऐकत नाही तिला मारहाण करतो आणि बंधक करुन ठेवतो. तक्रारदार महिलांचं म्हणणं आहे की त्याच्या एका पत्नीने आत्महत्या केली आहे. तर इतर महिला त्याला सोडून निघून गेल्या आहे. या प्रकरणात डीआयजी राजेश कुमार पांडेय म्हणाले की, शाहजहांपुरातील काही महिला त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी अनुज चेतन सरस्वती नावाच्या व्यक्तीवर आरोप केला आहे की, त्याने 5 लग्न केली आहेत. पुरावा म्हणून या महिलांनी काही छायाचित्रही दाखविली. ज्यावरुन हे सिद्ध होतंय की हा साधू महिलांच्या भावनांसोबत खेळत होता. डीआयजी पुढे जाऊन असंही म्हणाले की, शाहजहापूर पोलिसांनी या प्रकरणात तीन दिवसांत तपास करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. अनुज चेतन सरस्वती हा आरोपी शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही पोलीस क्षेत्रातील संगम इंटर कॉलेजजवळ राहतो.

  'टाटां'नी रोवली होती एअर इंडियाची मूळं, 88 वर्षांनी आता पुन्हा देणार आधार

  सोनिया गांधींची प्रकृती अद्याप अस्थिर, 'या' संसर्गामुळे होतोय त्रास

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime

  पुढील बातम्या