नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : डिस्कव्हरी चॅनलवर (discovery channel) 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' हा (man vs wild) शो होस्ट करणारा बेअर ग्रिल्स (Bear Grylls) तुम्हाला माहीत असेलच. बेअर ग्रिल्सनं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्वीटरवर (twitter) शेअर केला आहे. यात तो आणि नरेंद्र मोदी सोबत चहा (tea) पीत आहेत.
हा फोटो थ्रोबॅक पिक (throwback pic) म्हणून शेअर करताना बेअर ग्रिल्स लिहितो, की हा माझ्या आवडत्या फोटोजपैकी एक आहे. डिस्कव्हरी जंगल एडव्हेंचरमध्ये पावसात भिजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चहा पिणं. जंगल तुम्हा सगळ्यांना अगदी एकाच पातळीवर आणून उभं करतं. आपण सगळे आपापली पदं आणि मास्क बाजूला ठेवले तर एकसारखेच आहोत.
2019 साली पंतप्रधान मोदी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या एका शोमध्ये ग्रिलसोबत दिसले होते. याचं चित्रीकरण उत्तराखंड (Uttarakhand) इथल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये झालं होतं. 2019 साली 12 ऑगस्टला हा शो प्रसारित करण्यात आला होता. या शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि मोदी यांच्यादरम्यान अनेक रंजक संवाद झाले होते. बेअर ग्रिल्सनं मोदींसोबत मिळून एक भाला तयार केला. ते करताना ग्रिल्स मोदींना विचारतो, मी ऐकलं आहे की तुम्ही लहान असताना जंगलात खूप काळ घालवलाय. त्यावर मोदी म्हणतात, 'हो, मी हिमालयात जायचो. 17-18 वर्षांचा असताना मी घर सोडलं. तेव्हा काय करावं काय नको हा विचार करायचो. मला निसर्ग नेहमीच आवडत असे.' बेअर मोदींना म्हणतो, 'तुम्ही भारतातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. तुमचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे.
हे ही वाचा-कर्तव्यदक्ष टिंकीसाठी पोलिसांकडून अनोखी आदरांजली; गुन्हेगारांमध्ये होती दहशत
बेअर मोदींना भाला देतो. भाला देताना म्हणतो, 'कुणी वाघ (tiger) तुमच्याकडं आला तर तुम्ही त्याला मारून टाका.' यावर मोदी यांनी उत्तर दिलं होतं, 'कुणाला मारणं हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. मात्र तुमच्या सुरक्षेसाठी मी याला जवळ ठेऊन घेतो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pm narenda modi, Tea, Uttarakhand