ऑफिसमध्येच TikTok Video बनवित होता कर्मचारी, मिळाली ही शिक्षा

ऑफिसमध्येच TikTok Video बनवित होता कर्मचारी, मिळाली ही शिक्षा

हा कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळेतच हा उद्योग करत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत त्या कर्मचाऱ्याची झाडाझडती घेतली.

  • Share this:

हैदराबाद 17 जुलै : युवकांमध्ये TikTok Videoची क्रेझ आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही. या व्हिडिओचं वेड हे फक्त तरुणांनाच नसून सगळ्यांनाच लागल्याचं पुढे आलंय. तेलंगणातल्या खंम्मम महापालिकेच्या कर्मचाऱ्याला TikTok Videoचं वेड चांगलंच महागात पडलं. या कर्मचाऱ्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं स्पष्ट होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची बदली केली आणि पगारही कापला.

हा कर्मचारी ऑफिसमध्येच व्हिडिओ बनवत होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याची बातमी ऑफिसमध्येही पोहोचली. हा कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळेतच हा उद्योग करत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत त्या कर्मचाऱ्याची झाडाझडती घेतली आणि त्याचा पगारही कापला. आणखी शिक्षा म्हणून त्या कर्मचाऱ्याची दुसरीकडे बदली करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

माता न तू वैरिणी! स्वराच्या हत्येला धक्कादायक वळण, जन्मदात्या आईनेच घेतला जीव

TikTokमुळे लागला नवऱ्याचा शोध

TikTokवर बंदी घाला अशी मागणी जोर धरत असताना या TikTokमुळे तीन वर्षे गायब असलेल्या व्यक्तीचा शोध लागलाआहे. विश्वास नाही ना बसत? तामिळनाडूमधल्या वेल्लुपूरम येथील ही घटना आहे. चक्क TikTokवरून गायब असलेल्या व्यक्तीला शोधण्यास पोलिसांना यश आलं आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सुरेश असं या व्यक्तीचं नाव असून घरात पत्नीशी झालेल्या वादानंतर नाराज होऊन सुरेशनं 2016मध्ये घर सोडलं होतं. त्यानंतर त्यानं एका कंपनीत काम सुरू केलं. पत्नी जया प्रदा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली. पण, पोलिसांना देखील सुरेशचा शोध लागला नाही. अखेर TikTokच्या माध्यमातून सुरेशला शोधण्यास पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांना समजूत काढल्यानंतर सुरेश घरी परतला आहे.

भारताच्या विजयाचे हिरो? ज्यांनी कुलभूषण जाधवांसाठी घेतली फक्त 1 रुपया फी!

कसा लागला TikTokवरून शोध?

पत्नीशी झालेल्या भांडणानंतर सुरेशनं 2016मध्ये घरं सोडलं. सुरेश आणि जया प्रदा यांना दोन मुलं देखील आहेत. सुरेश गायब झाल्यानंतर जया प्रदा यांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. पण, कुणालाही सुरेशबद्दल काहीच माहीत नव्हतं. अखेर जया प्रदा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, पोलिसांना देखील सुरेशचा शोध लागला नाही. एके दिवशी सुरेश आणि जया प्रदा यांच्या नातेवाईकानं TikTokवर एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सुरेशमध्ये साम्य आढळून आलं. त्यानं तात्काळ ही गोष्ट जया प्रदा यांना सांगितली. जया प्रदा यांनी देखील या गोष्टीला पुष्टी देत पोलिसांशी संपर्क साधला.

नर्सेसनाही झाली होती शिक्षा

नवजात अर्भकांना ठेवण्यात येणाऱ्या अतिदक्षता विभागामध्ये टिकटॉक व्हिडिओ केल्याबद्दल चार नर्सेसना रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशामधल्या मलकानगिरी जिल्हा रुग्णालायामध्ये हा प्रकार घडला.

या टिकटॉक व्हिडिओमध्ये या नर्सेस नाचताना आणि गाताना दिसत आहेत. टिकटॉक हे छोटे म्युझिक व्हिडिओ बनवण्याचं एक अॅप आहे. नर्सेसनी, आपण कामाचे तास पूर्ण केल्यानंतर व्हिडिओ बनवला, असं म्हटलं आहे. पण त्यावेळी त्या युनिफॉर्ममध्ये होत्या आणि अशा प्रकारे टिकटॉक व्हिडिओ शूट करणं ही आमची चूक आहे हे मात्र त्यांनी कबूल केलं आहे.

ज्या नवजात अर्भकांना गंभीर स्वरूपाचे आजार झालेले असतात त्या अर्भकांना अशा प्रकारच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात येतं. इथे अर्भकांच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. त्यांना कोणताही जंतूसंसर्ग होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी लागते.

अशा स्थितीत ज्या नर्सेसनी या अर्भकांची काळजी घ्यायची त्या मोठमोठ्या आवाजात टिकटॉक व्हिडिओ करू लागल्या तर याला म्हणावं तरी काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

कमालीचा हलगर्जीपणा

रुबी रॉय, तापसी बिस्वास, स्वप्ना बाला आणि नंदिनी राय या चार नर्सेसनी अर्भकांच्या अतिदक्षता विभागात टिकटॉक व्हिडिओ केला. त्यावेळी त्या युनिफॉर्ममध्ये होत्या. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली.

जिल्हा न्यायदंडाधिकारी मनीष अगरवाल यांनी या चारही नर्सेसना रजेवर जाण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या नर्सेसनी आपल्या कामामध्ये कमालीचा हलगर्जीपणा केला आहे, असा शेरा मारत प्रशासनाने या नर्सेसना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या